कर्नाटक शासनाच्या आदेशानुसार शैक्षणिक वर्ष 2022- 23 च्या सुरुवातीच्या 14 दिवसांमध्ये इंद्रधनुष्य हा कार्यक्रम राबवायचा आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचे मनोरंजन व्हावे, त्यांनी उत्साहाने शाळेला यावे यासाठी क्रीडोत्सव, खेळणी बनविणे, नाटकोत्सव, टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनविणे या प्रकारच्या अनेक उपक्रमांचा समावेश आहे.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती टिकवून ठेवण्यास तसेच वाढविण्यास मदत होणार आहे. विद्यार्थ्यांनी केलेल्या उपक्रमांबरोबरच कोणते दाखले शाळेमध्ये ठेवले पाहिजेत याविषयी एकमत नाही. खाली दिलेला नमुना वर्गशिक्षकांसाठी नक्कीच उपयोगी ठरेल.