सहावी समाज विज्ञान प्रश्नोत्तरे


पाठ 1 – इतिहासाचा परिचय

योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.

इतिहासाचे पितामह हेरोडोटस् यांना म्हणतात.

सर विलीयम जोन्स यांनी दि एशिअटीक सोसायटीची स्थापना केली.

खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.

इतिहास म्हणजे काय?

उत्तर – पूर्वी घडून गेलेल्या घटना क्रमबद्ध व सुसंगतपणे सांगणे म्हणजेच इतिहास होय.

इतिहासाचे पितामह कोण? ते कोणत्या देशाचे होते?

उत्तर – इतिहासाचे पितामह हेरोडोटस् यांना म्हणतात. ते ग्रीक देशाचे होते.

आधाराशिवाय इतिहास नाही का?

उत्तर – इतिहासकार इतिहास सत्य आणि स्पष्टपणे सांगण्यासाठी साक्षी आधाराचा वापर करतो. त्यामुळे आधाराशिवाय इतिहास नाही असे आपण सांगू शकतो.

इतिहासाच्या आधारांची यादी करा.

उत्तर – इतिहासाला दोन प्रकारचे आधार आहेत.

1) साहित्यिक आधार              2) पुरातत्व आधार

पुरातत्व आधार म्हणजे काय?

उत्तर – प्राचीन मानवांनी निर्माण केलेल्या आणि वापरलेल्या भौतिक वस्तूचे अवशेष म्हणजेच  पुरातत्व आधार होय.

उदा. – नाणी, शिलालेख, स्मारक

भारतीय शास्त्रा संबंधी अध्ययन केलेल्या इतिहासकारांची नावे लिहा.

उत्तर – सर विलियम जोन्स, मॅक्स मुल्लर, जेम्स मिल, अबे डुबास, याशिवाय कोल, ब्रूक आणि डायस यांनी भारतीय शास्त्रा संबंधी अध्ययन केले.

गटात चर्चा करून उत्तर लिहा.

अबे डुबायस संबंधी टिपा लिहा.

उत्तर – अबे डुबायस नावाचे फ्रेंच मिशनरी श्रीरंगपट्टण जवळील गंजांगे येथे वास्तव्यास होते. स्थानिक संस्कृती आचरण करून ते सन्यासासारखे राहत होते. त्यामुळे त्यांना लोक महास्वामीजी असे म्हणत असत. त्यांनी हिंदू  सेरेमनीज नावाच्या साहित्य कृतींची रचना केली. यामध्ये त्यांनी भारतीयांच्या आचार विचार सणवार वर्णाश्रम, व्यवस्था इत्यादी संबंधीचे लेखन केले आहे.

  1. खालील अ गट व ब गटातील विषयाच्या जोड्या जुळवा.

अ                                     ब

कालिदास                      हिस्टरी ऑफ इंडिया

मक्स मुल्लर                   दि एशिअटीक सोसायटी

जेम्स मिल                     सेक्रेड बुक ऑफ दि ईस्ट

विलीयम जोन्स               शाकुंतल

उत्तर-

अ                                     ब

कालिदास                             शाकुंतल

मॅक्स मुल्लर                          सेक्रेड बुक ऑफ दि ईस्ट

जेम्स मिल                            हिस्टरी ऑफ इंडिया

विलीयम जोन्स                      दि ईस्ट दि एशिअॅटीक सोसायटी

पाठ 2 –  आपले कर्नाटक

खालील प्रश्नांची उत्तरे द्या.

प्राचीनकाळी कर्नाटकात राज्य केलेली तीन राजघराणी कोणती?

उत्तर- प्राचीनकाळी कर्नाटकात राज्य केलेली गंग घराणे, चोळ , होयसळ, विजयनगर मराठा, मैसुरू वडेयर ही काही राज्यघराणी होय.

बेंगळूरू विभागात किती जिल्हे आहेत?

उत्तर- बेंगळूरू विभागात 9 जिल्हे आहेत

या विभागात राज्य केलेल्या दोन पाळेगारांची नावे सांगा.

उत्तर – या विभागात केळदी, चित्रदुर्ग, यलहंका इत्यादी पाळेगारांनी राज्य केले.

खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

नैसर्गिक स्त्रोत म्हणजे काय? उदाहरणे द्या.

उत्तर- नैसर्गिकरीत्या मिळणाऱ्या विविध बाबींना नैसर्गिक स्त्रोत असे म्हणतात.

बेंगळूरू विभागातील सर्वात जास्त पाउस पडणारा जिल्हा कोणता?

उत्तर –  शिवमोग्ग हा बेंगळूरू विभागातील सर्वात जास्त पाउस पडणारा जिल्हा होय.

बेंगळूरू जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची कमतरता होण्याची कारणे कोणती?

उत्तर- प्रदूषण, अरण्यनाश, शहरीकरण अनेक नद्या नाश होण्याच्या मार्गावर आहेत. अनेक जलाशय भूअतिक्रमणामुळे नाश पावत आहेत. बेंगळूरू जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची कमतरता भासत आहे.

बेंगळूरू विभागातील दोन धबधब्यांची नावे लिहा.

उत्तर – जगप्रसिद्ध जोग धबधबा आणि आशियातील सर्वात उंच धबधबा गिरसप्पा बेंगळूरू विभागामध्ये आहे.

खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

बन्नेरघट्ट हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे?

उत्तर- बन्नेरघट्ट हे राष्ट्रीय उद्यान बेंगळूरू  जिल्ह्यात आहे

बेंगळूरू विभागातील अती उंच पर्वत शिखराचे नाव काय?

उत्तर- चित्रदुर्ग जिल्ह्यातील हालू रामेश्वर बेंगळूरू विभागातील अती उंच पर्वत शिखर होय.

बेंगळूरू विभागातील दोन पक्षीधामांची नावे लिहा.

उत्तर- गुडवी पक्षीधाम शिवमोग्ग आणि मंडगट्टे पक्षीधाम शिवमोग्ग हे  बेंगळूरू विभागातील दोन पक्षीधाम होय.

रामनगर जिल्ह्यातील पक्षीधामामध्ये कोणत्या पक्षांचे रक्षण केले जाते?

उत्तर-

खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

बेंगळूरू विभागातील प्रमुख आहार पिके कोणती?

उत्तर- नाचणा, मक्का, जोंधळा, भात, वाटाणा, ज्वारी, डाळी इत्यादी बेंगळूरू विभागातील प्रमुख आहार पिके होय.

तुतीची पाने ही कोणत्या उद्योगासाठी कच्चा माल ठरतो?

उत्तर- तुतीची पाने ही रेशीम उत्पादनासाठी कच्चा माल ठरतो.

भद्रावती येथील लोखंड व साखर कारखान्यांची स्थापना कोणत्या साली करण्यात आली?

उत्तर- भद्रावती येथील लोखंड व साखर कारखान्यांची स्थापना 1923 साली करण्यात आली.

बेंगळूरू विभागातील कोणत्या ठिकाणी तयार कपड्यांचे केंद्र आहे?

उत्तर- दोड्डबल्लापूर, आनेक इत्यादी बेंगळूरू विभागातील तयार कपड्यांचे केंद्र आहे

खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

ज्ञानपीठ प्रशस्ती मिळविलेल्या बेंगळूरू विभागातील तीन साहित्यिकांची नावे लिहा.

उत्तर- बेंगळूरू विभागातील राष्ट्रकवी कुवेंपू, मास्ती व्यंकटेश अय्यंगार व डॉ. यु. आर. अनंतमूर्ती यांना ज्ञानपीठ प्रशस्ती मिळाली आहे.

प्रसिद्ध म्युझीयम ‘ जानपद लोक’ याची स्थापना कोणी केली?

उत्तर- प्रसिद्ध म्युझीयम ‘ जानपद लोक’ याची स्थापना प्रसिद्ध साहित्यिक एच. एल. नागेगौडा यांनी केली.

बेंगळूरू शहरातील प्रत्येक वर्षी साजरा होणारा प्रसिद्ध उत्सव कोणता?

उत्तर- बेंगळूरू शहरातील प्रत्येक वर्षी साजरा होणारा प्रसिद्ध उत्सव करग उत्सव होय.

खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

शिवमोग्गा जिल्ह्यातील अरण्य विभागातील रोगाचे नाव काय?

उत्तर – माकड ताप हा रोग शिवमोग्गा जिल्ह्यातील अरण्य विभागात आढळतो.

भारतरत्न प्रशस्ती मिळविलेल्या बेंगळूरू विभागातील दोघांची नावे लिहा.

उत्तर- सर एम. विश्वेश्वरय्या आणि सी. एन. आर. राव हे भारतरत्न प्रशस्ती मिळविणारे दोघेही बेंगळूरू विभागातील होय.

ग्रामीण भागात असलेल्या सरकारी आरोग्य केंद्रांना काय म्हणतात?

उत्तर-  ग्रामीण भागात असलेल्या सरकारी आरोग्य केंद्रांना ‘ प्राथमिक आरोग्य केंद्र’ म्हणतात.

खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

मैसुरू राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण?

उत्तर- मैसुरू राज्याचे पहिले मुख्यमंत्री के. सी. रेड्डी हे होते.

कर्नाटक एकीकरणात भाग घेतलेल्या दोघांची नावे लिहा.

उत्तर- केंगल हनुमंतय्या आणि एस. निजलिंगप्पा यांनी कर्नाटक एकीकरणात भाग घेतला.

खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

बेंगळूरू विभागात किती जिल्हे आहेत?

उत्तर- बेंगळूरू विभागात 9 जिल्हे आहेत

दक्षिण भारतातील सर्वात मोठा तलाव शांतीसागर कोणत्या जिल्ह्यात आहे?

उत्तर-  दक्षिण भारतातील सर्वात मोठा तलाव शांतीसागर दावणगेरे जिल्ह्यात आहे.

बेंगळूरू विभागात अती जास्त अरण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?

उत्तर- बेंगळूरू विभागात अती जास्त अरण्य शिवमोग्ग जिल्ह्यात आहे.

राष्ट्रकवी कुवेंपूच्या नावाने विश्वविद्यालय कोणत्या जिल्ह्यात आहे?

उत्तर- राष्ट्रकवी कुवेंपूच्या नावाने विश्वविद्यालय शिवमोग्ग जिल्ह्यात आहे

मैसुरू विभाग

खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

मैसुरू विभागामध्ये सध्या किती जिल्हे आहेत?

उत्तर- मैसुरू विभागामध्ये सध्या 8 जिल्हे आहेत

मैसुरू हे नाव कशावरून पडले?

उत्तर-  महिषासुराला ठार मारलेल्या स्थळावरून मैसुरू हे नाव पडले.

मैसुरू संस्थानाच्या उद्धारासाठी 20 व्या शतकापूर्वी काम केलेल्या वडेयर राजांची नावे लिहा.

उत्तर- नाल्वडी कृष्णराज वडेयर यांनी  मैसुरू संस्थानाच्या उद्धारासाठी 20 व्या शतकापूर्वी काम केले.

किनारपट्टीला ब्रिटीश सुरुवातीला कोणत्या नावाने संबोधत असत?

उत्तर- किनारपट्टीला ब्रिटीश सुरुवातीला ‘कॅनरा’ नावाने संबोधत असत

II. रिकाम्या जागा भरा.

  1. दक्षिण कन्नड जिल्ह्याची विभागणी करून 1997 साली उडुपी जिल्ह्याची रचना करण्यात आली.

 2. मैसुरू विभागातील उडुपी आणि दक्षिण कन्नड हे किनारपट्टीचे जिल्हे आहेत?

खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

या विभागातील प्रमुख दोन नद्यांची नावे लिहा.

उत्तर- या विभागातील प्रमुख दोन नद्या हेमावती व हरंगी या होय.

या विभागातील अति जास्त पाऊस व अति कमी पाऊस पडणाऱ्या जिल्ह्यांची नावे लिहा.

उत्तर- या विभागातील उडुपी जिल्ह्यात अति जास्त पाऊस व मंड्या जिल्ह्यात अति कमी पाऊस पडतो.

या विभागातील जिल्ह्यांमध्ये सापडणाऱ्या दोन खनिजांची नावे सांगा.

उत्तर- बॉक्साईट व फेलीसाईट ही खनिजे या विभागातील जिल्ह्यांमध्ये सापडतात.

किनारपट्टीच्या लोकांचा प्रमुख व्यवसाय कोणता?

उत्तर- मासेमारी हा किनारपट्टीच्या लोकांचा प्रमुख व्यवसाय होय.

खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

या विभागातील दोन प्रसिद्ध अरण्यांची नावे लिहा.

उत्तर- बंडीपूर व नागरहोळे ही दोन प्रसिद्ध अभयारण्ये या विभागात आढळतात.

या विभागातील जिल्ह्यांमध्ये राहणाऱ्या दोन आदिवासी समुदायांची नावे लिहा.

उत्तर- जेनुकुरुबरु आणि कोरग हे आदिवासी समुदाय या या विभागातील जिल्ह्यांमध्ये राहतात.

दोन पक्षीधाम आणि दोन वन्यप्राणी अभयारण्यांची नावे लिहा.

उत्तर- रंगनथिट्टू आणि गुडवी हे पक्षीधाम तसेच बंडीपूर व नागरहोळे ही दोन प्रसिद्ध अभयारण्ये या विभागात आढळतात.

रिकाम्या जागा भरा.

  1. आमचा राष्ट्रीय प्राणी वाघ आहे.
  2. जंगली हत्तींना पाळण्याच्या पद्धतीला खेड्ड म्हणतात.

खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

1.मैसुरू विभागातील दोन राष्ट्रीय उद्यानांची नावे सांगा.

उत्तर- मैसुरू जिल्ह्यात राजीव गांधी नागरहोळे तर चामराजनगर जिल्ह्यात बंडीपुर ही दोन राष्ट्रीय उद्याने या विभागात आहेत.

2. मैसुरू विभागातील प्रमुख पिके कोणती?

उत्तर- मैसुरू विभागातील प्रमुख पिके भात, नाचना, ज्वारी, आवरे, मूग, उडीद इत्यादी होत.

3. या विभागातील शेतीला पाण्याचा पुरवठा करणाऱ्या दोन योजनांची नावे लिहा.

उत्तर- या विभागातील शेतीला पाण्याचा पुरवठा करण्यासाठी चार धरणातून व्यवस्था केलेली आहे. कृष्णराजसागर, हारंगी, हेमावती आणि कबिनी.

4. या विभागातील तीन प्रमुख कुटिरोद्योग कोणते?

उत्तर-  या विभागातील जिल्ह्यांमध्ये शेती पिकांबरोबरच कुकुटपालन, शेळीपालन तसेच दुग्धव्यवसाय हे व्यवसाय केले जातात.

      रिकाम्या जागा भरा.

1.मैसुरू विभागातील चिक्कमंगळूरू या जिल्ह्यामध्ये जास्त कॉफीचे उत्पादन घेतले जाते.

खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

  1. कोडव साजरा करत असलेल्या सुग्गी उत्सवाचे नाव काय?

उत्तर- कोडव साजरा करत असलेल्या सुग्गी उत्सवाचे नाव ‘उत्तरी’ होय.

  • कर्नाटक सरकारच्या नाटक संस्थेचे रंगमंचाचे केंद्र स्थान कोणत्या शहरात आहे?

उत्तर- कर्नाटक सरकारच्या नाटक संस्थेचे रंगमंचाचे केंद्र स्थान मैसुरू शहरात आहे.

  • या विभागातील दोन इंग्लिश कादंबरीकारांची नावे सांगा.

उत्तर- हासनमधील राजाराव आणि आर. के. नारायण हे या विभागातील दोन प्रसिद्ध इंग्लिश कादंबरीकार होय.

  • कन्नडच्या प्रसिद्ध दोन साहित्यिकारांची नावे लिहा.

 उत्तर- के. एस. नरसिंहस्वामी आणि गोरुरूरामस्वामी अयंगार हे कन्नडचे दोन प्रसिद्ध साहित्यिक होय.

खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

  1. मैसुरू मध्ये शतमानोत्सव साजरा करत असलेल्या विश्वविद्यालयाचे नाव सांगा.

उत्तर- मैसुरू विश्वविद्यालयाचा शतमानोत्सव मैसुरू मध्ये साजरा केलेला आहे.

  • ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य सेवा देणाऱ्या केंद्राचे नाव काय?

उत्तर- आरोग्य उपकेंद्र ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य सेवा पुरविते.

  • दोन आरोग्य सुचींची नावे सांगा.

उत्तर- येथे मुलांना रोगनिरोधक इंजेक्शन देण्यात येतात. गर्भिणी आणि बाळंतीणींची सेवा करण्यास आरोग्य सहाय्यक, आशा कार्यकर्ता आहेत.

खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

  1. मैसुरू विभागात समाविष्ट झालेल्या दोन इंग्लिश कादंबरीकारांची नावे लिहा.

उत्तर- हासनमधील राजाराव आणि आर. के. नारायण हे या विभागातील दोन प्रसिद्ध इंग्लिश कादंबरीकार होय.

  • स्वातंत्र्य लढयाबरोबरच अस्पृश्यता निवारण चळवळीत सहभागी असलेल्या दोन समाज सुधारकांची नावे लिहा.

उत्तर- मंगळूरचे कुदमल रंगराव आणि तगडूरू रामचंद्रराव यांनी स्वातंत्र्य लढयाबरोबरच अस्पृश्यता निवारण चळवळीत सहभाग घेतला.

  • श्रवणबेळगोळ कशासाठी प्रसिद्ध आहे?

उत्तर- श्रवणबेळगोळ गोमटेश्वराच्या एकशिला मूर्तीसाठी प्रसिद्ध आहे.

  • चार स्वातंत्र्य सैनिकांची नावे लिहा.

उत्तर- एच.सी. दासप्पा, यशोधरम्मा दासप्पा, कार्नाड सदाशिवराव, एच. के. विरण्णगौडा हे चार स्वातंत्र्यसैनिक होत.

रिकाम्या जागा भरा.

  1. कावेरी नदीचा उगम तलकावेरी येथे झाला.
  2. कुदमल रंगराव यांनी अस्पृश्यता याच्या निवारणासाठी कार्य केले.
  3. मैसुरू मध्ये होत असलेल्या विश्वविख्यात उत्सव दसरा आहे.
  4. मैसुरू विभागातील कोडगू आणि …..  जिल्ह्यामध्ये बंदरे आहेत.

खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

    1. मैसुरू विभागातील जिल्ह्या मध्ये पिकणाऱ्या व्यापारी पिकांची यादी करा .

उत्तर- ऊस, भात, कॉफी, काजू, सुपारी, नारळ इत्यादी व्यापारी पिके मैसुरू विभागातील जिल्ह्या मध्ये पिकवली जातात.

2. दक्षिण कन्नड आणि उडुपी जिल्ह्यातील दोन बंदरांची नावे सांगा.

उत्तर- पेनंबुर आणि नवमंगळुरू ही दोन दक्षिण कन्नड आणि उडुपी जिल्ह्यातील दोन बंदरेआहेत.

3. या विभागातील कोणकोणत्या ठिकाणी गोमटेश्वराचा पुतळा आहे?

उत्तर-  दक्षिण कन्नड जिल्ह्यातील वेणूर येथे आणि उडुपी जिल्ह्यातील कार्कळ या ठिकाणी गोमटेश्वराचा पुतळा आहे.

4. कावेरी नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी झाला आहे?           

उत्तर-  कावेरी नदीचा उगम कोणत्या कोडगू तलकावेरी याठिकाणी झाला आहे .

पाठ 3 – प्राचीन समाज

योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.

1. अक्षरांचा परिचय नसलेल्या कालखंड ला इतिहास पूर्व काळ म्हणतात.

2.  सूक्ष्म शिलायुगाला मध्य शिलायुग असे म्हणतात.

3. भारतीय उपखंडात कृषी संबंधी सुरुवातीचे अवशेष (पुरावे) मेहरगर या ठिकाणी आढळतात.

ii} खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.

1) इतिहासाचे तीन प्रमुख कालखंड कोणते?

उत्तर – इतिहासाचे प्रमुख कालखंड 1)इतिहास पूर्व काळ  2)आद्य इतिहास काळ  3)इतिहास काळ इत्यादी होय.

2) पृथ्वीचा जन्म कधी झाला?

उत्तर – पृथ्वीचा जन्म 4600 मध्ये झाला.

3) प्राचीन शिलायुगातील मानवाच्या उपकरणांची नावे लिहा.

उत्तर – चाकू दगडाचा धारदार पाते, मोठ्या दगडी उपकरणांचा वापर प्राचीन शिलायुगातील मानव करत असे.

4) मध्य शिलायुगाला सूक्ष्म शिलायुग असे का संबोधतात?

उत्तर – कालखंड म्हणजे प्राचीन शिलायुग आणि नवीन शिलायुगाच्या मधला कालावधी होय म्हणून याला मध्य शिलायुग असे म्हणतात.या काळातील मानव मोठमोठ्या दगडी हत्याराऐवजी लहान दगडी हत्यारांचा वापर करू लागला त्यामुळे या काळाला सूक्ष्म शिलायुग असे म्हणतात.

5) कोणत्या युगात मानवाने शेती करण्यास सुरुवात केली?

उत्तर – नवीन शिलायुगात मानवाने शेती करण्यास सुरुवात केली.

6) मानवाने विकसित केलेला पहिला धातू कोणता?

उत्तर –  मानवाने विकसित केलेला पहिला धातू तांबे होय.

7) भव्य शिलायुगातील स्मारकांना सर्वसामान्य जनता कोणत्या नावाने संबोधतात?

उत्तर –  भव्य शिलायुगातील स्मारकांना सर्वसामान्य जनता पांडवाचे देऊळ / घर , मौर्याचा दगड नावाने संबोधतात.

8) कर्नाटकात असलेल्या भव्य शिलायुगातील स्थळांची नावे लिहा.

उत्तर – बनहट्टी, हिरेबेन्नकल्लू, ब्रम्हगिरी, कोप्प हेगडेहळी, टी.नरसिपूर, हेम्मिगे, हळूर, जडीगेनहट्टी, सावनदुर्ग, दुभिदुर्ग, पांडवरदिन्नी इत्यादी.

4. प्राचीन संस्कृती

I रिकाम्या जागा भरा.

1) इजिप्त संस्कृतीचा नाईल नदीकाठावर उदय झाला.

2) गिल्हे जवळील जगातील मोठे पिरॅमिड बांधविलेला फेरो खुफू.

3) जगातील सर्वात पहिली  साम्राज्ञी हयाषेपुट होय.

4) सिंहाचे शरीर, मनुष्याचे तोंड धारण केलेले इजिप्त मधील शिल्पकलेला स्फिंक्स म्हणतात.

खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.

  1. जगातील सर्वात लांब नदी कोणती?

उत्तर – जगातील सर्वात लांब नदी नाईल होय.

  • इजिप्त ला नाईलची देणगी असे का म्हणतात?

उत्तर – नाईल नदी नसती तर संपूर्ण इजिप्त वाळवंटी प्रदेश बनला असता.म्हणून इजिप्त ला नाईल नदी ची देणगी असे म्हणतात.

  • फेरो म्हणजे काय? प्रमुख फेरोंची नावे लिहा     

उत्तर – इजिप्त च्या राजांना फेरो म्हणून संबोधत होते, यांच्यानंतर आलेल्या फेरो मध्ये खुफू, अमेन, होप्पं, थटमोस हे प्रमुख होते.

  • जगातील सर्वात मोठे पिरॅमिड कोणते? ते कोणी बांधविले?

उत्तर – गिल्हे जवळील पिरॅमिड हे जगातील सर्वात मोठे पिरॅमिड होय. ते फेरो खुफू याने बांधविले.

  • मम्मी म्हणजे काय?

उत्तर –  इजिप्तमधील लोकांना पुनर्जन्मावर विश्वास होता. त्यामुळे शव (मरण पावलेल्या माणसांचे शरीर) सुरक्षित ठेवत होते. व त्या सुरक्षित ठेवलेल्या शवांना मम्मी म्हणतात.

  • प्राचीन इजिप्त लोकांची लिपी कोणती?

उत्तर – प्राचीन इजिप्त लोकांची लिपी हेरोग्लीफिक्स होय.

  1. रिकाम्या जागा भरा.
  2. असुरबनिपाल  याने निनेव्ह नगरमध्ये ग्रंथालयाची निर्मिती केली.
  3. सुमेरियन लोक क्यूनीफारम लिपीमध्ये लेखन करीत होते.
  4. जगामध्ये सर्वात पहिल्यांदा कायदे संहिता आमलात आणलेला राजा हामुराबी

II)खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 

  1. मेसोपोटेमिया कोणत्या नदी काठी उदयास आले?

उत्तर – आजच्या इराक देशातील तैग्रिस आणि युफ्रेटिस नद्यामध्ये मेसोपोटेमिया संस्कृतीचा उदय झाला.

  • मेसोपोटेमिया नंतर कोणी कोणी राज्य केले?

उत्तर – मेसोपोटेमिया नंतर सुमेरियन, बॉंबिलोनियन, हित्रेत्रीयान, अस्सिरीयन, आणि नव बॉबिलोनियन इत्यादी वंशजांनी राज्य केले.

  • मेसोपोटेमिया ची नगर राज्ये कोणकोणती?

उत्तर – मेसोपोटेमियाची नगर राज्ये ऊर(गडी),किश,लगाश इत्यादी आहेत.

  • हम्मरबी यांच्यावर टीप लिहा.

उत्तर – बॉबीलोनियनांच्या मध्ये प्रसिद्ध राजा हम्मरबी होय. हा त्याच्या कायद्याच्या संहितेमुळे जगप्रसिद्ध झाला. जशाच तसे या तत्वावर हे कायदे आहेत. बॉबीलोनियानांच्या नंतर कासेट आणि हित्रेत नावांच्या जमातीने मेसोपोटेमियावर काही काळ राज्य केले.

  • बॉबिलोन शहरामधील “झुलता बगीचा” कोणी निर्माण केला?

उत्तर – बॉबिलोन शहरामधील झुलता बगीचा नेबुखेडनेजर यांनी निर्माण केला.

  • मेसोपोटेमियनांचे महाकाव्य कोणते?

उत्तर –  गिल्गमेश हे मेसोपोटेमियनांचे महाकाव्य होय.

ही पोस्ट शेअर करा...