इयत्ता सहावी मराठी प्रश्नोत्तरे


पाठ 1. देहमंदिर चित्तमंदिर

अ) खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.

1. नित्य कोणती आराधना झाली पाहिजे?

उत्तर – सत्य, सुंदर, मंगलाची नित्य आराधना झाली पाहिजे.

2. दुख कोणाचे जावो असे कवीला वाटते?

उत्तर – दुखीतांचे दुख जावो असे कवीला वाटते.

3. वेदना जाणावयाला काय केले पाहिजे?

उत्तर – वेदना जाणावयाला संवेदना जागवायला पाहिजे.

4. मानवाच्या जीवनाला कशाचा वेध लागला पाहिजे?

उत्तर – मानवाच्या जीवनाला सुंदराचा वेध लागला पाहिजे.

5. एकतेची कल्पना पूर्ण होण्यास काय विसरले पाहिजे?

उत्तर – एकतेची कल्पना पूर्ण होण्यास भेद व वैर विसरले पाहिजे.

आ) खालील कवितेच्या ओळी पूर्ण कर.

1. दु:खितांचे दु:ख जावो हि मनाची कामना

   वेदना जाणावयाला जाणवू संवेदना

   दुर्बलांच्या रक्षणाला पौरुषाची साधना

   सत्य सुंदर मंगळाची नित्य हो आराधना

2. भेद सारे मावळू द्या, वैर साऱ्या वासना

   मानवाच्या एकतेची पूर्ण हो कल्पना

   मुक्त आम्ही फक्त मानू बंधूतेच्या बंधना

   सत्य – सुंदर – मंगलाची नित्य हो आराधना

ई) खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.

1. मंदिर देऊळ  

2. शौर्य – पराक्रम   

3. कामना इच्छा

4. वैर – शत्रुत्व  

5. नित्य – नेहमी

उ) खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.

1. नित्य x अनित्य

2. सुंदर x कुरूप

3. मंगल x अमंगल

4. अंतरंग x बाह्यरंग

5. मुक्त x बंदिस्थ

6. दुर्बल x सबल

पाठ 2. वीर राणी चनम्मा

अ) खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.

1. राणी चन्नम्मा चा जन्म केंव्हा व कोठे झाला?

उत्तर – राणी चन्नम्मा चा जन्म 1778 साली बेळगावी जिल्ह्यातील काकती येथील देसायांच्या घरी झाला.

2. चन्नम्मा कोणकोणत्या विद्येत निपुण होती?

उत्तर – चन्नम्मा घोड्यावर बसणे, पोहणे, भाला फेकणे, दांडपट्टा फिरविणे या विद्येत निपुण होती.

3. राजा मल्लसर्जाचे निधन केव्हा झाले?

उत्तर – राजा मल्लसर्जाचे निधन 1816 मध्ये झाले.

4. धारवाडचा कलेक्टर कोण होता?

उत्तर – धारवाडचा कलेक्टर थॅकरे हा होता.

5. राणीने थॅकरे च्या पत्राला उत्तर का पाठविले नाही?

उत्तर – मोठे सैन्य घेवून थॅकरे कित्तूरजवळ ठाण मांडून बसला होता. राणीला हे रुचले नाही. त्यामुळे तिने थॅकरेच्या पत्राला उत्तर पाठविले नाही.

6. गुरुसिद्धपास कोणती शिक्षा दिली?

उत्तर – गुरुसिद्धपास फाशीची शिक्षा दिली.

7. राणीने आपले शेवटचे दिवस कसे घालविले?

उत्तर – राणीने आपले शेवटचे दिवस एकांतात घालविले.

आ) अर्थ सांगून वाक्यात उपयोग कर.

1. हित जोपासणे

    राणीने प्रजेचे हित जोपासण्याचे ठरविले होते.

2. ठाण मांडणे –

    थॅकरेचे सैन्य ठाण मांडून बसले होते.

3. तोंड देणे –

राणीला एकाचवेळी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते.

4. चेव चढणे –

राणीच्या करारी बाण्यामुळे सैन्याला चेव व स्फूर्ती आली.

5. माघार घेणे –

राणीने प्रतिकूल परिस्थितीतही माघार घेतली नाही.

इ) रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.

1. चन्नम्मा सुंदर आणि गुणसंपन्न होती.

2. थॅकरेच्या पत्राला राणीने उत्तरच पाठविले नाही.

3. मल्लसर्जाने आपल्या उत्तम गुणांनी कित्तूर च्या प्रजेचे प्रेम मिळविले.

4. राणीच्या करारी बाण्यामुळे सैन्याला चेव व स्फूर्ती आली.

5. चन्नमाला नंदगड येथे कैदेत ठेवले.

ई) योग्य जोड्या जुळवा.

           अ                            ब

1. संगोळी रायन्ना                राजा

2. चन्नम्मा                          सरदार

3. थॅकरे                           कलेक्टर

4. सय्यद बाळासाहेब           राणी

५. मल्लसर्ज                        अंगरक्षक

उत्तर-

           अ                            ब

1. संगोळी रायन्ना                सरदार

2. चन्नम्मा                          राणी

3. थ्याकरे                          कलेक्टर

4. सय्यद बाळासाहेब          अंगरक्षक

५. मल्लसर्ज                        राजा

उ) विरुद्धार्थी शब्द लिहा.

1. प्रिय x अप्रिय

2. स्मरण x विस्मरण

3. सुप्रसिद्ध x कुप्रसिद्ध

4. स्तुती x निंदा

ऊ) कोणी कोणास म्हटले ते सांग.

1. कोणत्याही परिस्थितीत तोंड देण्यास तयार राहा.

उत्तर – वरील वाक्य राणीने सैन्यांना म्हटले आहे.

3. निसर्गातील चमत्कार : वीज

अ) खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.

1. आकाशात चमकणारी वीज कोणत्या वळणाची असते?

उत्तर – आकाशात चमकणारी वीज नागमोडी वळणाची असते.

2. ढग कशापासून तयार होतात?

उत्तर – ढग वाफेपासून तयार होतात.

3. नेहमी एकमेकांकडे आकर्षिले जाणारे विद्युतभार कोणते?

उत्तर – नेहमी एकमेकांकडे आकर्षिले जाणारे विद्युतभार धन आणि ऋण होय.

4. ढगामधील इलेक्ट्रॉन्सचा प्रवाह किती रुंद असतो?

उत्तर – ढगामधील इलेक्ट्रॉन्सचा प्रवाह 1 ते 4 इंच रुंद असतो.

आ) खालील रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.

1. पावसाळ्यात ढगांच्यावर  धन विद्युतभार निर्माण होतो.

2. आकाशातील वीज 1/500 ते 1/100 या वेळेत निर्माण होते.

3. वीज 100 ते 150 फुट लांब विद्युतरस्ता तयार करते.

4.निळ्या रंगाची वीज ऑक्सिजनओझोन मध्ये चमकल्यास दिसते.

5. सूर्यापासून मिळणाऱ्या उर्जेला सौरऊर्जा असे म्हणतात.

इ. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिही.

1. वीज कशी निर्माण होते?

उत्तर – निसर्गातील वीज निर्माण होताना सर्वप्रथम वाफेपासून तयार झालेले ढग जसजसे आकाराने व वजनाने वाढू लागतात तसतसे त्याच्यावर विद्युतभार जमायला लागते या प्रकारे वीज निर्माण होते

2. विजेचे प्रकार किती व कोणते?

उत्तर – विजेचे प्रकार 5 आहेत.

1. फीत विद्युत     

2. फोर्कड लाईटनिंग     

3. दुलई विद्युत

4. गोल विद्युत     

5. सेंट एल्मोची आग

3. वीज कोणकोणत्या रंगात दिसते?

उत्तर – वीज तांबड्या, हिरव्या, पोपटी, पिवळ्या आणि निळ्या रंगात दिसते.

4. वीज वेगवेगळ्या रंगात दिसण्याचे कारण कोणते?

उत्तर – वीज वेगवेगळ्या रंगात दिसण्याचे कारण म्हणजे वातावरणात अनेक वायू असतात.

5. विजेचे वहन कसे होते? त्याचा परिणाम काय होतो?

उत्तर – विजेचे वहन विद्यूत पट्ट्यामध्ये होते. त्याचा परीणाम म्हणजे या मार्गात आडव्या येणाऱ्या गोष्टींना त्याचा तडाखा बसतो.

6. वीज जास्तीत जास्त कोठे आकर्षिली जाते?

उत्तर – वीज ही पाणी, सर्वात उंच वस्तू, धातूची वस्तू याकडे जास्त आकर्षिली जाते.

7. विजेबद्दलच्या गैरसमजुती कोणत्या?

उत्तर – वीज फक्त पावसाळ्यात चमकते, वीज आकाशातून खाली येते, वाळवंटात वीज पडत नाही, एकाच ठिकाणी वीज पुन्हा पुन्हा पडत नाही आणि विजेचा तडाखा बसल्यानंतर कोणी जिवंत राहत नाही. या विजेबदल गैरसमजुती आहेत.

4. पाऊस

अ) खालील प्रश्नांची उत्तरे लिही.

१. दर्यावरची दौलत कोण लुटून नेत आहे?

उत्तर – दर्यावरची दौलत ढग लुटून नेत आहे.

2. मोती केंव्हा ओघळतात?

उत्तर – खजिना फुटून वाटेवरती पडतो तेव्हा मोती ओघळतात.

3. गवताची पाती कशी न्हात आहेत?

उत्तर – गवताची पाती ओणवी होऊन न्हात आहेत.

4. चिमणी कोठे दडून बसते?

उत्तर – कौलारूच्या आड चिमणी दडून बसते.

5. बाग बहरल्यामुळे काय झाले?

उत्तर – बाग बहरल्यामुळे पानोपानी नवा तजेला दिसत आहे.

6. गुलाब कलिका कुणाची राणी आहे?

उत्तर – गुलाब कलिका सर्व फुलांची राणी आहे.

इ) समानार्थी शब्द लिहा.

1. जल – पाणी

2. ढग – नभ, मेघ

3. वारा – हवा

4. पाखरे – पक्षी

ई) जोडशब्द बनव

1. जसे – पानोपानी

2. कपडा – लत्ता

3. धन – दौलत

4. सोने – चांदी

5. जमीन – जुमला

6. भाजी – पाला

7. सोने – चांदी

ऊ) खालील अर्थाचे कवितेत आलेले शब्द लिही

1. पाने – पाती

2. कळी – कलिका

3. अंघोळ – न्हाती

4. पुष्प – फुले

5. खग – ढग

ही पोस्ट शेअर करा...