पाचवी परिसर अध्ययन सराव प्रश्नमंजुषा


इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना पहिल्या चार पाठांची उजळणी आणि सराव व्हावा यासाठी ही पाचवी परिसर अध्ययन सराव प्रश्नमंजुषा तयार केली आहे. ही ऑनलाईन प्रश्नमंजुषा सोडविल्यास निश्चितच सराव होईल व याचा खूपच फायदा होईल.

प्रत्येकवेळी आपण एक पाठ झाला की पुढील पाठाचा अभ्यास करतो. पण मागे शिकलेला पाठ विसरतो. त्यामुळे इयत्ता पाचवी परिसर अध्ययन सराव खूपच उपयुक्त ठरेल.

106

पाचवी परिसर अध्ययन

1 / 20

सजीव श्वसनावाटे ..................... वायू शरीराबाहेर सोडतात.

2 / 20

ज्या वनस्पती एक वर्ष अथवा हंगामापुरत्या कालावधीत फुलांची, फळांची, बियांची  निर्मिती करून नष्ट होतात त्यांना .............. वनस्पती म्हणतात.

3 / 20

जे प्राणी दुसऱ्या प्राण्यांना खातात त्यांना ................. असे म्हणतात.

4 / 20

रोमांचक आणि विशेष अनुभव देणाऱ्या शारीरिक सामर्थ्यावर आधारीत खेळांना ................. म्हणतात.

5 / 20

......................... ही माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली भारतीय महिला होय.

6 / 20

क्रिकेट आणि हॉकी हे .................... खेळ आहेत.

7 / 20

................... मुळे शरीर निरोगी राहते.

8 / 20

वेगवेगळ्या कारणामुळे पाणी दुषित होते त्यालाच ............... प्रदूषण असे म्हणतात.

9 / 20

लोक शिक्षण आणि उद्योगासाठी कोठे जातात?

10 / 20

दाट अरण्यामध्ये आणि डोंगराळ प्रदेशामध्ये राहणाऱ्या कुटुंबाच्या समूहाला ............... समाज म्हणतात.

11 / 20

भारतात शेकडा किती लोक ग्रामीण भागात राहतात?

12 / 20

गावामध्ये अनेक कुटुंब राहतात. या सर्व कुटुंबांच्या समूहाला ............... असे म्हणतात.

13 / 20

आईच्या बहिणीला काय म्हणतात?

14 / 20

वडिलांच्या वडिलांना काय म्हणतात?

15 / 20

ज्या कुटुंबामध्ये चार पिढ्या एकाच घरामध्ये राहतात त्या कुटुंबास ..................... कुटुंब असे म्हणतात.

16 / 20

ज्या कुटुंबामध्ये फक्त दोन पिढ्यांचे सदस्य राहतात त्यांना .................. कुटुंब असे म्हणतात.

17 / 20

सर्व सजीव आपल्यासारख्या पिल्लांना जन्म देतात या क्रियेला ................. असे म्हणतात.

18 / 20

'आंबा' ही वनस्पती ...................... आहे.

19 / 20

वनस्पती सूर्यप्रकाश, कार्बन डाय ऑक्साईड, पाणी व क्षार  शोषून घेऊन आहार तयार करतात यालाच .................. असे म्हणतात.

20 / 20

सजीव कशापासून बनलेले असतात?

Your score is

The average score is 71%

0%

इयत्ता पाचवी प्रश्नोत्तरे व प्रश्नमंजुषा येथे मिळवा.

सुट्टीचा अभ्यास येथे मिळवा.

KiteStudy App डाऊनलोड करा.

ही पोस्ट शेअर करा...