सुट्टीमध्ये मुलांचा अभ्यासाशी संपर्क राहावा यासाठी आम्ही सुरु करत आहोत रोजचा अभ्यास…
रोजचा अभ्यास दिवस 4
विषय – परिसर / विज्ञान
वर्ग | अभ्यास | Online प्रश्नमंजुषा / प्रश्नसंच |
इयत्ता पहिली | आपल्या सभोवतालच्या सहा प्राण्यांची चित्रे गोळा करून नावे लिहिणे. तुला आवडणाऱ्या प्राण्याचे चित्र काढून रंगव. सभोवतालचे प्राणी काय खातात , त्यांचा आवाज कसा आहे, याबद्दल माहिती मिळव. | दिलेल्या अभ्यासावर आधारीत Online प्रश्नमंजुषा मिळविण्यासाठी येथे क्लिक करा. |
इयत्ता दुसरी | तुला माहीत असलेल्या 10 प्राण्यांची चित्रे गोळा करून त्यांची नावे लिही. कुत्रा या प्राण्याबद्दल पाच ओळी माहिती लिही. मिळेल त्या पक्ष्यांचे पंख गोळा करून निरीक्षण करणे. | दिलेल्या अभ्यासावर आधारीत Online प्रश्नमंजुषा मिळविण्यासाठी येथे क्लिक करा. |
इयत्ता तिसरी | तुला माहीत असलेल्या 10 जंगली प्राण्यांची नावे लिही. आपल्याला खालील प्राण्यांचा काय उपयोग होतो ते लिही. कुत्रा 2) गाय 3) घोडा 4) बैल | दिलेल्या अभ्यासावर आधारीत Online प्रश्नमंजुषा मिळविण्यासाठी येथे क्लिक करा. |
इयत्ता चौथी | आपल्या घरातले प्राणी आपल्याला कसे मदत करतात याबद्दल माहिती लिही. पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांची नावे लिही. आपल्यामध्ये आणि इतर प्राण्यांमध्ये असणारे साम्य ( सारखेपणा) याबद्दल लिही. | दिलेल्या अभ्यासावर आधारीत Online प्रश्नमंजुषा मिळविण्यासाठी येथे क्लिक करा. |
इयत्ता पाचवी | सजीव आणि निर्जीव यातील फरक सांगून त्यांची 10-10 उदाहरणे लिहा. सजीवांची कोणतीही 4 लक्षणे लिहा. पचन संस्थेची आकृती काढून भागांना नावे द्या. | दिलेल्या अभ्यासावर आधारीत Online प्रश्नमंजुषा मिळविण्यासाठी येथे क्लिक करा. |
इयत्ता सहावी | वनस्पतीची आकृती काढून भागांना नावे लिही. 10 शास्त्रज्ञांची नावे लिहून त्यांनी लावलेले शोध लिहा. | दिलेल्या अभ्यासावर आधारीत Online प्रश्नमंजुषा मिळविण्यासाठी येथे क्लिक करा. |
इयत्ता सातवी | प्राण्यांच्या आहार सेवन करण्याच्या पद्धतीवरून त्यांचे किती व कोणते प्रकार पडतात ते लिही. रवंथ करणाऱ्या प्राण्यांच्या पचनक्रियेबद्दल माहिती लिही. आपल्याला आहाराची आवश्यकता का असते याबद्दल माहिती लिही. | दिलेल्या अभ्यासावर आधारीत Online प्रश्नमंजुषा मिळविण्यासाठी येथे क्लिक करा. |