आपण दैनंदिन जीवन जगत असताना अनेक गोष्टीसाठी विज्ञानावर अवलंबून असतो. बऱ्याचदा अनेक गोष्टींमध्ये विज्ञान दडलेले आहे हे आपणास माहितच नसते. त्यामुळेच आपल्या रोजच्या जीवनातील विज्ञानावर आधारीत खालील 21 प्रश्न आपल्यासमोर आहेत.
या प्रश्नांचा अर्थ समजून, त्यामागे लपलेले विज्ञान समजून उत्तरे शोधा.
रोजच्या जीवनातील विज्ञान
1. आगपेटीच्या काडीवर असलेल्या काळ्या पदार्थाचे नाव काय ?
2. गॅस जेंव्हा सिलिंडर ( टाकी) मध्ये असतो तेंव्हा तो कोणत्या खालीलपैकी अवस्थेत असतो. अ) वायुरूप ब) घनरूप क) द्रवरूप
3. आपल्या शरीराचा सर्वात मोठा भाग कोणता?
4. पावसाच्या पाण्यामध्ये कोणते जीवनसत्व असते?
5. बल्बमध्ये आढळणारी तार कोणत्या धातूची असते?
6. दिवसा आपल्याला कोणता तारा दिसतो?
7. जमिनीवर राहणारा सर्वात मोठा प्राणी कोणता?
8. पाणी उकळल्यास काय तयार होते?
9. मोठा आणि लहान असे दोन दगड हवेत उडविल्यास सर्वात आधी कोणता खाली पडेल?
10. पेटत्या मेणबत्तीवर ग्लास ठेवल्यास ती विझते. याचे कारण काय?
11. रात्रीच्यावेळी नखे काढू नये. याचे कारण काय?
12. वनस्पतीच्या कोणत्या भागावर मधमाशी बसते? का?
13. काहीवेळा पाल आपली शेपूट का सोडून देते?
14. जमिनीखाली असणाऱ्या वनस्पतीच्या भागाला काय म्हणतात?
15. बटाटा हा वनस्पतीचा कोणता भाग आहे?
16. आपण पाण्यात जास्तवेळ बुडून का राहू शकत नाही?
17. इंद्रधनुष्यामध्ये किती व कोणते रंग असतात?
18. आधी वीज होते व नंतर गडगडण्याचा आवाज होतो. हे स्वतः पहा व याचे कारण शोधा.
19. सर्वात लहान हाड आपल्या शरीरातील कोणत्या भागात असते?
20. आपल्या आजूबाजूच्या झाडांची पाने हलण्याचेकारण काय?
21. समुद्रामध्ये पाणी खूप असते पण ते पिण्यालायक नसते. याचे कारण काय?
वरील प्रश्न PDF रुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.
वरील प्रश्नांची उत्तरे PDF रुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.