सातवी मराठी प्रश्नोत्तरे


1. सर्वात्मका शिवसुंदरा

अ. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.

कवीने प्रभूला कोणती विनंती केली आहे?

उत्तर – आमच्या अभिवादनाचा स्वीकार कर असे कवीने प्रभूला विनंती केली आहे.

ईश्वर कोठे कोठे आहे असे कवीला वाटते?

उत्तर –  ईश्वर सुमनात , गगनात व ताऱ्यांमध्ये आहे असे कवीला वाटते.

ईश्वर कोणाची आसवे पुसतो?

उत्तर –  जे रंजले गांजले आहेत ईश्वर त्यांची आसवे पुसतो.

न्यायासाठी लढणारे यांना ईश्वर काय देतो

उत्तर –  न्यायासाठी लढणाऱ्याला ईश्वर तलवार देतो.

माणसाला केव्हा भय वाटत नाही?

उत्तर – माणसाच्या पाठीमागे जेव्हा देव असतो तेव्हा त्याला भय वाटत नाही.

ईश्वर कोणा समवेत व कोठे श्रमतो

उत्तर – ईश्वर श्रमिका समवेत शेतामध्ये श्रमतो.

आ. तीन-चार वाक्यात उत्तरे लिहा.

1. ईश्वराला सर्वात्मक असे का म्हटले आहे?

उत्तर – ईश्वर हा सर्वव्यापी असून तो सगळीकडे असतो. तो जे रंजले , गांजले आहेत त्यांच्या सोबत ही असतो आणि जे न्यायासाठी लढत आहेत त्यांच्या सोबतही असतो. म्हणून त्याला सर्वात्मक असे म्हटले आहे.


इ.. खालील शब्दाप्रमाणे शब्द तयार करा.
            ध्येय         ध्येयार्थ              ध्येयासाठी
            न्याय        न्यायार्थ             न्यायासाठी
            ज्ञान          ज्ञानार्थ              ज्ञानासाठी
            ध्यास        ध्यासार्थ             ध्यासासाठी
            राष्ट्र    राष्ट्रार्थ              राष्ट्रासाठी
            त्याग         त्यागार्थ              त्यागासाठी
            हित        हितार्थ               हितासाठी
ई. खालील कवितेच्या ओळी पूर्ण करा
1. जे रंजले वा गांजले
    पुसतोस त्यांची आसवे
    स्वार्थ विना सेवा जिथे
    तेथे तुझे पद पावन

2. सुमनात तू गगनात तू
    ताऱ्यांमध्ये फुलतोस तू
    सद्धर्म जे जगतामध्ये
    सर्वात त्या वसतोस तू
उ. खालील कवितेच्या ओळींचा अर्थ तुझ्या शब्दात लिही.
न्यायार्थ जे लढती रणी

तलवार तू त्यांच्या करी
ध्येयार्थ जे तमी चालती

तू दीप त्यांच्या अंतरी

उत्तर – या विश्वाचा निर्माता सर्वात्मक असा ईश्वर सर्वांची काळजी घेतो. जे लोक स्वतःला न्याय मिळवा या भावनेने लढत असतात ईश्वर त्यांना बळ देतो , त्यांच्या हातातील तलवार बनतो. तसेच जे लोक आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी आहोरात्र  प्रयत्न करत आहेत ईश्वर त्यांना दीप होऊन दिशा दाखविण्याचे कार्य करतो. असे वरील ओळींमध्ये कवी म्हणतो.

खालील शब्दांना कवितेत आलेले समानार्थी शब्द लिहा.
अंधार      –     तिमिर
प्रकाश      –     तेज
फुल         –     सुमन
आकाश    –     गगन
अश्रू        –     आसवे
दिवा       –     दीप

शब्दातील अर्थाचे नमुने प्रमाणे फरक सांगा.
कर –  हात
कर –  काम करण्यास आज्ञा
पद –  पाय
पद – अधिकार, हुद्दा
सुमन – फुल
सुमन – चांगले मन
अंतर –  मनात
अंतर – लांबी, भेद
वाक्यात उपयोग कर.
अभिवादना – कवी आपल्या अभिवादनाचा स्वीकार कर अशी ईश्वराला विनंती करत आहे.
प्रार्थना – आपण निर्माण मानाने केलेली प्रार्थना ईश्वर नक्की स्वीकारतो.
करुणा – ईश्वर हा करुणाकर असतो.

पाठ 2. अभ्यास एक छंद

स्वाध्याय:

अ. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

1. पुस्तकातील पाठांशी आपला संवाद केंव्हा सुरु होईल?

उत्तर – कुणी आपल्याला आवडलेली माहीती खूप हौसेने सांगतो आहे अशा भावनेने जर आपण पुस्तक हाती धरलं तरच आपला पुस्तकाशी संवाद सुरु होईल.

2. पुस्तक मित्रासारखे केंव्हा वाटते?

उत्तर – आपल्यापेक्षा ज्यानं खूप निरनिराळ्या गोष्टींचा अनुभव घेतलाय अशा मित्राच्या सहवासात आपण दोन – चार तास तास काढणार आहोत असं समजल्यास पुस्तक मित्रासारखे वाटते.

3. अभ्यासाच्या सरावाची लेखकाने कशाशी तुलना केली आहे?

उत्तर –  लेखकाने अभ्यासाची तुलना पोहोता न येणाऱ्या  मुलाची पोहोण्यासाठीची धडपड आणि प्रयत्नांशी केली आहे.

4. इंग्रजी विषयाशी दोस्ती केंव्हा जमेल?

उत्तर – जेंव्हा आपण इंग्रजी विषयाच्या मागे लागू, त्याची शब्द संपत्ती वाढवत जावू तेंव्हा आपली इंग्रजी विषयाशी दोस्ती जमेल.

5. अभ्यासाला ‘एक छंद’ असे का म्हटले आहे?

उत्तर – अभ्यास हा एक कोडे सोडविण्यासारख आहे. कोडं सुटत नाही तोपर्यंत ते कठीण. तो एक छंद झाला तरच शिकनं हा आनंदाचा भाग होऊन जाईल.

6. परीक्षा हा आनंदसोहळा केंव्हा होईल?

उत्तर – खेळापासून गणितापर्यंत जर सर्वांशी आपण मैत्री केली तर परीक्षा हा एक आनंदसोहळा होईल.

आ. वाक्याप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग कर.

1. कानगोष्टी करणे – गुपित सांगणे

वाक्य : खेळापासून गणितापर्यंत जर सर्वांशी आपण मैत्री केली तर परीक्षा हा एक आनंदसोहळा होईल. ही कान्गोस्त लेखकाने आपल्याला सांगितली आहे.

2. हातपाय गळणे –  खूप घाबरणे

वाक्य : गणिता विषयाचे नाव ऐकताच  अर्धे विद्यार्थी हातपाय गाळतात.

3. हात पुढे करणे – मदत करणे, मैत्रीसाठी पुढाकार घेणे

वाक्य : आपण मित्राप्रमाणे मैत्रीचा हात पुस्तकांच्या पुढे केला पाहिजे.

नमुना : कवी   –  कविता

नाटककार –    नाटक

चित्रकार –     चित्र

शिल्पकार –    शिल्प

कादंबरीकार –   कादंबरी

नकलाकार –   नकल

ई. फरक लिही.

कोडी – कोंडी                             तोड – तोंड

चिता – चिंता                             नदी – नंदी

उ. पाठाच्या  आधारे खालील वाक्ये पूर्ण कर.

1. परीक्षेला पुस्तक नेमलय म्हणून वाचल तर त्या लेखकाशी तुमचा संवादच सुरु होणार नाही.

2. पुस्तकाशी मैत्री केली तर तो एक आनंदसोहळाच होईल.

3. एखाद्याशी मैत्री जमविण्याचा उत्तम उपाय आपण आपल्या मैत्रीचा हात त्याच्या पुढे करणे.

4. इंग्रजीशी दोस्ती जमविण्याकरीता त्या भाषेतील शब्दांशी मैत्री जमवा.

ऊ. कंसातील योग्य विशेषणे वापरून मोकळ्या जागा भर.

( पांढऱ्याशुभ्र , निळ्याभोर , हिरवीगार, काळेकुट , पिवळीजर्द )

1. पिंपळाची हिरवीगार पाने सळसळत होती.

2. बागेत शेवंतीची पिवळीजर्द फुले फुलली होती.

3. दारात जाईजुईच्या  पांढऱ्याशुभ्र फुलांचा सडा पडला होता.

4. निळ्याभोर तलावात कमळे फुलली होती.

5. आकाशात काळेकुट ढग जमले होते.

ए. “ माझा आवडता छंद “ या विषयावर 10 वाक्ये लिही.

प्रत्येकाला कोणता ना कोणता तरी छंद असतो. आणि तो असावाही. माझ्या छंदामुळे कोणालाही त्रास होत नाही तर फायदाच होतो. मग सांगा पाहू माझा छंद कोणता असेल?

          मला गोष्टीची पुस्तके आणि वर्तमानपत्रे वाचण्याची आवड आहे. तोच माझा छंद आहे. माझ्या गावामध्ये वाचनालय आहे. तिथे काही वडीलधारी व्यक्ती दररोज वर्तमानपत्रे वाचतात. त्यांच्या सहवासात राहून मलाही वाचनाचा छंद जडला. मी ही आता दररोज सकाळी शाळेला येण्याआधी तेथील सर्व वर्तमानपत्रे आणि गोष्टीची पुस्तके वाचतो. त्या वाचनाच्या छंदामुळे मी शाळेतील कोणतेही पुस्तक न अडखळता वाचू शकतो.

( सूचना – हा निबंध फक्त नमुन्यासाठी आहे. विद्यार्थ्याने आपल्या छंदाचे वर्णन स्वतःच्या शब्दात लिहायचं आहे.)

ऐ. विरुध्द अर्थी शब्द लिही.

 थोर x           लहान                     

सुसंवाद x       विसंवाद

 आरंभ x        शेवट                      

आनंद    x      दुख

 आवड x         नावड

ओ. लिंग बदल करून लिही.

कवी –   कवयित्री          लेखक –  लेखिका          

  वक्ता – वक्ती

3. माझी आई

स्वाध्याय:

अ. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

1. डॉ. रघुनाथ माशेलकरांना कोणाकडून प्रेरणा मिळाली?

उत्तर –  डॉ. रघुनाथ माशेलकरांना त्यांच्या आईकडून प्रेरणा मिळाली.

2. इ.स. 2000 सालचे विज्ञान अधिवेशन कोठे भरले?

उत्तर – इ.स. 2000 सालचे विज्ञान अधिवेशन पुण्यात भरले.

3. डॉ. माशेलकरांच्या आईचे नाव काय होते?

उत्तर – डॉ. माशेलकरांच्या आईचे नाव अंजलीबाई होय.

4. डॉ. माशेलकरांचे मूळ गाव कोणते?

उत्तर – दक्षिण गोव्यातलं माशेल हे डॉ. माशेलकरांचे मूळ गाव होय.

5. डॉ. माशेलकरांची कोणती इच्छा होती?

उत्तर – आईला चार दिवस सुखाचे लाभावेत ही डॉ. माशेलकर यांची इच्छा होती.

6. डॉ. माशेलकरांच्या आईला काय आवडत नसे?

उत्तर – डॉ. माशेलकरांनी गोत्या , पत्ते खेळलेले त्यांच्या आईला आवडत नसे.

आ. दोन ते तीन  वाक्यात उत्तरे लिही.

1. अंजलीबाईनी मनाशी कोणता निश्चय केला?

उत्तर – अंजलीबाईना तिसरी पास नसल्याने त्यांना शिवणकाम मिळाले नाही. त्यामुळे मी माझ्या मुलाला खूप खूप शिकवीन असा अंजलीबाईनी मनाशी निश्चय केला.

2. महाविद्यालयीन शिक्षणानंतर माशेलकर नोकरी का शोधू लागले?

उत्तर – बऱ्याच वर्षांच्या काबाड कष्टानंतर आईला चार दिवस सुखाचे लाभावेत यासाठी महाविद्यालयीन शिक्षणानंतर रासायनिक अभियंता ही पदवी संपादन केल्यांनतर माशेलकर नोकरी शोधू लागले.

3. डॉ. माशेलकरांच्या आईंना का समाधान वाटले?

उत्तर – इ.स. 2000 साली विज्ञान अधिवेशनात तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यासह अनेक नोबेल पुरस्कारप्राप्त शास्त्रज्ञ आणि विविध क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीत डॉ माशेलकराना अध्यक्षीय भाषण करताना टी. व्ही. वर पाहून त्यांच्या आईना समाधान वाटले.

4. तुमच्या कोणकोणत्या गोष्टी वडिलधाऱ्याना आवडतात?

उत्तर – ह्या प्रश्नाचे उत्तर विद्यार्थ्याने स्वतः लिहायचं आहे.

इ. खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग कर.

1. सामोरे जाणे – संकटास तोंड देणे

वाक्य – अंजलीबाई येणाऱ्या प्रत्येक संकटास धैर्याने सामोरे गेल्या.

2. डोळ्यात पाणी येणे – दुख होणे.

वाक्य: शाळेतील वह्या घ्यायला पैसे नसल्याने आईच्या डोळ्यात पाणी येत असे.

3. निश्चय करणे – ठरविणे

वाक्य : अंजलीबाईनी मुलाला खूप शिकविण्याचा निश्चय केला.

4. सार्थक होणे  –  सफल होणे

वाक्य – माशेलकर मोठे झाल्यामुळे अंजलीताईनी घटलेले कष्ट सार्थक झाले.

ई. योग्य जोड्या जुळवा.

1. स्वामी विवेकानंद                               अ. वैज्ञानिक

2. छ. शिवाजी महाराज                       आ. क्रिकेटपटू

3. साने गुरुजी                                      इ. तत्वज्ञानी

4. डॉ. रघुनाथ माशेलकर                       ई. आदर्श राजा

5. सचिन तेंडूलकर                             उ. श्यामची आई

उत्तर –

1. स्वामी विवेकानंद            तत्वज्ञानी                

2. छ. शिवाजी महाराज         आदर्श राजा

3. साने गुरुजी                       श्यामची आई 

4. डॉ. रघुनाथ माशेलकर      वैज्ञानिक

5. सचिन तेंडूलकर               क्रिकेटपटू

उ. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिही.

1. प्रतिकूल  x अनुकूल                          2. कीर्ती     x  अपकीर्ती

3. यश      x   अपयश                             4. पास      x   नापास

5. मृत्यू      x जन्म                                  6. परदेश   x    स्वदेश

7. व्यक्त     x अव्यक्त                              8. धीर      x    अधीर

ऊ. खालील वाक्य कोणी, केंव्हा व कोणास म्हटले आहे ते संदर्भासह लिही.

1. “ माझी आई माझे प्रेरणास्थान आहे.”

उत्तर – वरील वाक्य डॉ. माशेलकरांनी आपले आयुष्य कसे घडले हे सांगताना वाचकांना उद्देशून म्हटले आहे.

2. “ मी माझ्या मुलाला खूप खूप शिकवीन.”

उत्तर – शिक्षण नसल्याने  अंजलीबाईना शिवणकाम न मिळाल्यामुळे त्यांनी वरील वाक्य स्वतःला संबोधून म्हटले.

3. “ तुझ्या विषयातील पुढची पदवी कोणती?”

उत्तर – माशेलकर यांनी रासायनिक पदवी घेतल्यानंतर नोकरी करण्याचा निर्णय घेतल्याने आईने वरील वाक्य त्यांना उद्देशून म्हटले आहे.

4. “ आपल्या कष्टाचे फळ परमेश्वर आपल्याला देतोच.”

उत्तर – डॉ. माशेलकरांना शिक्षण घेताना घराची काळजी वाटत असल्याने आईने वरील वाक्य त्यांना उद्देशून म्हटले आहे.

ओ. खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिही.

1. कोणतीही तक्रार न करणारा –              आज्ञाधारक

2. सतत पैसे खर्च करणारा –                    खर्चिक, उधळ्या

3. देशाची सेवा करणारा –                     देशसेवक , देशभक्त

4. आपल्याच मनाप्रमाणे चालणारा –        हटवादी

5. इतरांना मार्ग दाखविणारा –                मार्गदर्शक

6. स्वतःशी केलेले भाषण –                      आत्मचिंतन

7. गावाच्या पंचाचे राज्य –                     ग्रामपंचायत

8. कधीही नाश न पावणारे –                   अविनाशी

9. शरण आलेला –                                  शरणार्थी

10. कार्य करण्याची पात्रता असणारा –     लायक

( वरील पाठांवर आधारीत online टेस्ट सोडविण्यासाठी येथे CLICK करा.)

ही पोस्ट शेअर करा...