स्वातंत्र्य दिन – मराठी भाषण क्र.1


सालाबादप्रमाणे यावर्षी देखील भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात देशात सर्वत्र साजरा केला जात आहे. सर्वत्र याबद्दलची तयारीही चालू आहे. हा कार्यक्रम सर्व सरकारी कार्यालात तसेच शाळांमध्येही साजरा केला जातो. यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्याचाच एक भाग म्हणजे स्वातंत्र्य दिन – मराठी भाषण स्पर्धा.

विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी स्वातंत्र्य दिन – मराठी भाषण नमुना भाषण खालीलप्रमाणे देत आहोत.

नमस्कार,

सन्माननीय अध्यक्ष, मंचावर उपस्थित अतिथी गणशाळा समितीचे अध्यक्ष, उपस्थित सर्व सदस्यग्रामपंचायत सदस्यआमच्या शाळेचे मुख्याध्यापकशिक्षक वर्गउपस्थित पालकआणि माझ्या बाल मित्र-मैत्रिणींनो.

सर्वप्रथम सर्वांना  76 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…

मी …………  आज आपल्याला या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त दोन शब्द सांगणार आहे ते आपण शांत पणे  ऐकावे अशी नम्र विनंती…

15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. या आधी जवळपास दीडशे वर्ष ब्रिटिशांनी आपल्या भारतावर राज्य केले.  या देशाचे मूळ मालक हे भारतीय  नागरिक असूनही  ब्रिटिशांनी भारतीयांना पशूप्रमाणे वागणूक दिली.  याच वागणुकीला कंटाळून  महात्मा गांधी,  सुभाष चंद्र बोस,  पंडित जवाहरलाल नेहरू,  लाला लजपत राय  यांच्यासारख्या अनेकांनी  मोठा लढा उभारून  भारतीयांना स्वातंत्र्य मिळवून देण्यास जिवाचे रान केले.

आणि त्यामुळेच आपला देश ब्रिटिशांच्या ताब्यातून मुक्त झाला.  म्हणूनच आपण आजचा हा  15 ऑगस्ट चा दिवस  दरवर्षी भारतीय स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो.

एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो. 

जय हिंद जय भारत!

ही पोस्ट शेअर करा...