4. नायक पाळेगार आणि नाडप्रभू
या पाठाची प्रश्नोत्तरे खाली दिलेली आहेत. Iyatta Satavi Prashnottare. ते PDF मध्ये DOWNLOAD करण्यासाठी खाली लिंकही दिलेली आहे.
I. रिकाम्या जागा योग्य शब्दाने भरा
1. पोर्तुगीजाना हरविण्यासाठी मोठ्या वेंकटप्पा नायकाला मदत केलेली उल्लाळची राणी अबक्का होय
2. राणी चन्नम्मानी मोगलांना पळवून लावून राजाराम ला संरक्षण दिल.
II. खालील प्रश्नाची एका वाक्यात उत्तरे लिहा.
1.केळदीच्या इतिहासात पश्चिम समुद्राचा राजा असे कोणाला म्हणतात ?
उत्तर- केळदीच्या इतिहासात पश्चिम समुद्राचा राजा असे शिवप्पा नायक म्हणतात.
2.गोव्याच्या ख्रिश्चनाना शिवप्पा नायकाने कसे प्रोत्साहित केले ?
उत्तर- गोव्याचे ख्रिस्ती शेतीमध्ये निपुण होते. त्यांना आपल्या राज्यात स्थलांतरित होण्यास जमीन, पैसे देऊन शिवप्पा नायकाने प्रोत्साहन दिले.
3.सिस्तु म्हणजे काय ?
उत्तर- शिवप्पा नायकांनी लागू केलेल्या महसूल व्यवस्थेला सिस्तु म्हणतात.
4. राणी चन्नम्माजी कोण होत्या?
उत्तर- राणी चन्नम्माजी शिवप्पा नायकाची सून होती.
III. दोन किंवा तीन वाक्यात उत्तरे द्या.
1.मोठ्या वेंकटप्पा नायकाचे कार्य कोणते ?
उत्तर- मोठ्या वेंकटप्पाच्या काळात केळदी सामुर्ण स्वतंत्र झाले. किनारपट्टीवरील चंद्रगिरीनदीपर्यंत विजय संपादन केला. मंगळूरमध्ये पोर्तुगिजांचा पराभव केला. विजापूरच्या आदिलशहाच्या सैन्याचा पराभव करून विजयस्तंभ उभारला. त्याने सर्व धर्मांना प्रोत्साहन दिले.
2. .केळदीच्या नायकानी केलेल्या कामगिरीची माहिती लिहा .
उत्तर- केळदीच्या नायकांनी कर्नाटकची किनारपट्टी व मळनाड प्रदेशावर राज्यकारभार केला. केळदी संस्थान विशाल आणि संपन्न होते. शिवमोग्गा, दक्षिण कन्नड, उडुपी, केरळचे कासरगोड, कोडगू, हासन, तुमकुरु, चित्रदुर्ग, धारवाड आणि उत्तर कन्नड या भागाचा केळदी राज्यात समावेश केला.
खालील प्रश्नाची एका वाक्यात उत्तरे लिहा
1. मत्ती तिम्मन्ना नायक कोण होता ?
उत्तर- मत्ती तिम्मन्ना नायक हा चित्रदुर्ग संस्थानचा पहिला राजा होता.
2. राजा वीर मदकरी नायक याबद्धल टीपा लिहा ?
उत्तर- राजा वीर मदकरी नायक हा चित्रदुर्गच्या नायकापैकी अत्यंत प्रबळ राजा होता.वयाच्या केवळ 12 व्या वर्षी सिंहासनावर बसला. हैदरअलीने चित्रदुर्गला वेढा देऊन त्याचा पराभव केला. मदकरी च्या राजवटीबरोबर चित्रदुर्गच्या नायकांचा वंश संपुष्टात आला.
3. ओनके ओब्बवाचे आपण आजही स्मरण का करतो ?
उत्तर- हैदरअलीच्या सैनिकांनी किल्ल्याच्या गुप्त मार्गाने प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पहारेकऱ्याची पत्नी ओनके ओब्बव्वा हिने बाजूला असलेल्या मुसळाने अनेक शत्रू सैनिकांना ठार केले. आजसुद्धा आपल्याला चित्रदुर्ग किल्ल्याच्या पश्चिमेला ‘ओब्बव्वाची खिंड’ पहावयास मिळते. त्यामुळे आजही आपण तिचे स्मरण करतो.
4. चित्रदुर्गाच्या नायकानी निर्माण केलेल्या तलावांची नावे लिहा
उत्तर- भरमसागर आणि भिमसमुद्र हे तलाव चित्रदुर्गाच्या नायकानी निर्माण केले.
खालील प्रश्नाची एका वाक्यात उत्तरे लिहा
1. सुरपूर संस्थानचा संस्थापक कोण ?
उत्तर- सुरपूर संस्थानचा संस्थापक गड्डीपिड्डनायक हा होय.
2. सुरपूरची राजधानी कोणी निर्माण केली ?
उत्तर- सुरपूरची राजधानी पितांबरी बहरी पिट्टनायक याने निर्माण केली.
खालील प्रश्नांची उत्तरे गटात चर्चा करून लिहा .
1. चौथ्या वेंकटप्पा नायकाच्या कार्याची टीपा लिहा .
उत्तर- चौथ्या वेंकटप्पा नायकाने दक्षिण भारतातील सर्व राजांना एकत्र करून ब्रिटीशांच्या विरुद्ध लढण्यास सज्ज केले. अरब, रोहिल यांनासुद्धा सैन्यात समावेश करून घेतला. एवढेच नव्हे तर त्याने सैन्याला प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली.
2. सुरपूर नायकांच्या संस्कृतिक योगदानाबद्दल लिहा .
उत्तर- सुरपूर नायकांनी तळे, विहिरी, देवालये, राजवाडे, किल्ले इत्यादी निर्माण केले. त्यांनी आपले कुलदैवत तिरुपती व्यकटरामन आणि गोपाल स्वामीच्या रोजच्या पूजेसाठी जहागीरी, भूमी इनाम म्हणून दिली. यांच्या काळात अनेक कलाकार, गायक, चित्रकार, शिल्पकार, साहित्यिक आश्रयाला होते. अनेक मौल्यवान साहित्य कृतींची निर्मिती याच काळात झाली. ते सर्वधर्म समभाव जपत होते.
एका वाक्यात उत्तरे लिहा.
1. यलहंका नाडप्रभू घराण्याचा संस्थापक कोण ?
उत्तर- यलहंका नाडप्रभू घराण्याचा संस्थापक रणभैरेगौडा हा होय.
2. बेंगळूरू शहराची स्थापना कोणी केली ?
उत्तर- बेंगळूरू शहराची स्थापना केंपेगौडा यांनी केली.
3. यलहंका नाडप्रभूंच्या राजधानीची नावे लिहा ? केंपेगौडाची बिरुदावली कोणती ?
उत्तर- बेंगळूरू व मागडी या यलहंका नाडप्रभूंच्या राजधान्या होत्या. केंपेगौडाला ‘प्रजावत्सल’ अशी बिरुदावली होती.
4. इम्मडी मोठे केंपेगौडानी कोणती पदवी धारण केली ?
उत्तर- इम्मडी मोठे केंपेगौडानी ‘नव कविता गुंभपुंभवाणी’ ही पदवी धारण केली.
II. दोन तीन वाक्यात उतरे लिहा
1. पहिल्या केंपेगौडाच्या कार्याचे वर्णन करा .
उत्तर- पहिल्या केंपेगौडाने बेंगळूरू शहराची स्थापना केली. त्याने बेंगळूरू किल्ला बांधून तिथून राज्यकारभार केला. बेंगळूरूतील बसवण गुडी येथील बसव देवालय, हलसुरातील सोमेश्वर देवालयाची निर्मिती आणि गवी गंगाधरेश्वर देवालयाचा जीर्नोधार केला. अनेक तळी निर्माण केली.
2. .इम्मडी केंपेगौडाबद्दल टीपा लिहा
उत्तर- इम्मडी केंपेगौडा हा वीर योद्धा नव्हता तर बहुभाषा पंडित मात्र होता. त्याला ‘नव कविता गुंभपुंभवाणी’ अशी पदवी होती. त्याने राणीसाठी कुणीगल आणि हुलीयुरू या किल्ल्यात अग्रहार, तलाव, देवालय इत्यादींची निर्मिती केली.
वरील प्रश्नोत्तरे PDF मध्ये मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.
पाठ 5. मैसुरचे वडेयर प्रश्नोत्तरे येथे मिळवा.