मागील वर्षाप्रमाणे यावर्षी म्हणजेच शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी इयत्ता 5 वी व 8 वीचे मूल्यमापन केंद्र स्थळी होणार आहे. यासाठी शैक्षणिक मार्गदर्शिकेतही तसा उल्लेख करण्यात आला आहे. त्याविषयी माहितीही देण्यात आलेली आहे.
उद्देश
मुलांची अध्ययन पातळी मोजणे.
विद्यार्थ्यांच्या अध्ययनातील कमतरता समजून घेणे.
विद्यार्थ्याचे कोणत्या विषयामध्ये अध्ययन कमी आहे हे समजून घेणे.
अध्ययनांश / सामर्थ्यांवर आधारित मूल्यमापन करून आणि विश्लेषण करणे
प्रश्नपत्रिकेचे स्वरूप
एकूण गुण = 50
40 गुणांसाठी लेखी तर 10 गुणांसाठी मौखिक मूल्यमापन.
वेळ : 2 तास
प्रश्नांचे स्वरूप : 20 गुणांचे MCQ आणि 20 गुणांचे वाक्यांमध्ये लिहिण्यासाठी प्रश्न.
मूल्यमापन केंद्र आणि मूल्यमापन कार्य
परीक्षेच्या शेवटच्या दिवशी उत्तर पत्रिका तालुक्यातील केंद्रावर नेल्या जातील.
5 वी व 8 वी चे मूल्यांकनाचे नियोजन तालुक्यातील एका शाळेमध्ये केले जाईल.
अभ्यासक्रम
यावर्षी कलिका चेतरिके नसल्याने पाठ्यपुस्तकातील निश्चित केलेला अभ्यासक्रम हाच या मूल्यमापनासाठी ठरविला जाईल.
तसेच हा आभ्यासक्रम शैक्षणिक मार्गदर्शिकेनुसार मासिक आणि वार्षिक पाठनियोजनाचे प्रमाण दिलेले आहे.
महिना | निश्चित केलेली अभ्यासक्रमाची टक्केवारी |
जून | 10 % |
जुलै | 15 % |
ओगस्ट | 15 % |
सप्टेंबर | 10 % |
ऑक्टोबर | SA1 |
नोव्हेंबर | 20 % |
डिसेंबर | 20 % |
जानेवारी | 10 % |
फेब्रुवारी | उजळणी |
मार्च | मूल्यमापन |
या मूल्यमापनाची नवनवीन माहिती व आवश्यक सराव प्रश्नपत्रिका याचठिकाणी अपलोड केल्या जातील.