8. मराठे | Marathe
या पाठाची प्रश्नोत्तरे खाली दिलेली आहेत. Iyatta Satavi Prashnottare. ते PDF मध्ये DOWNLOAD करण्यासाठी खाली लिंकही दिलेली आहे.
I.रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून पूर्ण करा.
1. शिवाजीचे गुरु दादोजी कोंडदेव होते.
2.शिवाजीने व्याघ्रनखाच्या च्या सहाय्याने अफजल खानाचा वध केला.
3.औरंजेबाच्या जयसिंग या सरदाराने शिवाजीचा पराभव केला.
II.खालील प्रश्नांची उत्तरे द्या.
1.शिवाजीचा जन्म कोठे झाला ?
उत्तर- शिवाजीचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला.
2. शिवाजीच्या आई वडिलांची नावे सांगा.
उत्तर- शिवाजींच्या आईचे नाव जिजाबाई आणि वडिलांचे नाव शहाजी भोसले होते.
3.विजयपुरच्या सुलतानाने शिवाजीला का विरोध केला ?
उत्तर- शिवाजीने 19 व्या वर्षी विजयपुरच्या आदिलशहाच्या अधीन असलेला तोरणा किल्ला जिंकला. नंतर रायगड, सिंहगड, प्रतापगड इत्यादी किल्ले जिंकले. त्यामुळे विजयपुरच्या सुलतानाने शिवाजीला विरोध केला.
4. शाहिस्तेखान कोण होता ?
उत्तर- शाहिस्तेखान हा औरंगजेबचा दख्खन मधील सरदार होता.
5.शिवाजीचा राज्याभिषेक कोठे झाला ? त्यावेळी त्यांनी कोणती पदवी धारण केली ?
उत्तर- शिवाजीचा राज्याभिषेक रायगडावर झाला. त्यावेळी त्यांनी छत्रपती ही पदवी धारण केली
6.मराठा साम्राज्यातील प्रमुख पेशव्यांची नावे लिहा.
उत्तर- बाळाजी विश्वनाथ, पहिले बाजीराव आणि बाळाजी बाजीराव हे मराठा साम्राज्यातील प्रमुख पेशवे होते.
वरील प्रश्नोत्तरे PDF मध्ये मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.
पाठ 7. मोगल प्रश्नोत्तरे येथे मिळवा.