9. आपले संविधान

9.  आपले संविधान

I. गटात चर्चा करून उत्तरे द्या .

1. संविधान म्हणजे काय ?

उत्तर- एखाद्या देशाने अनुसरलेले मुलभूत कायदे म्हणजे संविधान होय.

2. संविधान समितीचे अध्यक्ष कोण होते ?

उत्तर- संविधान समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद हे होते.

3. डॉ.बी.आर.आंबेडकर यानी संविधान रचना कार्यात कोणते योगदान दिले ?

उत्तर- संविधानाची मसुदा प्रत तयार करण्यासाठी समिती नेमली गेली. त्या समितीचे अध्यक्ष डॉ.बी.आर.आंबेडकर हे होते.

4.भारताला कोणत्या दिवशी प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून घोषित करण्यात आले ?

उत्तर- भारताला 26 जानेवारी 1950 या दिवशी प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून घोषित करण्यात आले

5. प्रौढ मतदान पद्धत म्हणजे काय ?

उत्तर- सर्व प्रौढ मतदार ( 18 वर्षावरील ) मतदानाद्वारे लोकप्रतिनिधींची निवड करतात. या पद्धतीला प्रौढ मतदान पद्धत म्हणतात.

6. गणराज्य म्हणजे काय ?

उत्तर- प्रजेकडून निवडून आलेल्या लोकप्रतिनधीमार्फत राज्यकारभार चालविला जाण्याच्या पद्धतीला प्रजासत्ताक गणराज्य म्हणतात.

7.सर्वधर्म समभाव म्हणजे काय ?

उत्तर- कोणत्याही प्रकारचा पक्षपात न करता सर्व धर्मियांना समान भावनेने पाहणे म्हणजेच सर्वधर्म समभाव होय.

पाठ 7. मोगल प्रश्नोत्तरे येथे मिळवा.

ही पोस्ट शेअर करा...