वनस्पतीचे पोषण
Video आवडल्यास Fern Classes and Art या You tube channel ला नक्की subscribe करा.
अभ्यास –
1. सजीवांना आहाराची आवश्यकता का असते?
उत्तर – सजीवांना ऊर्जा मिळविण्यासाठी शरीराच्या वाढीसाठी आणि प्रति पाहण्यासाठी आहाराची आवश्यकता असते.
2. परोपजीवी आणि शवोपजीवी यातील फरक स्पष्ट करा.
उत्तर – ज्या वनस्पती आहारासाठी इतर वनस्पतीतील पोषकद्रव्ये शोषून घेतात त्यांना परोपजीवी म्हणतात तर ज्या वनस्पती मृत अथवा कुजणाऱ्या पदार्थावर काही पाचक रस यांचा स्त्राव करून त्यांचे शोषण करतात त्यांना शवोपजीवी म्हणतात.
3. पानांमध्ये स्टार्च आहे याचे परीक्षण कसे करावे?
उत्तर – एका परीक्षा नळीत हिरवे पान घाला व पान पूर्णपणे बुडेल इतके स्पिरीट परीक्षानळीत ओता. आता परीक्षानळी पाण्याने अर्ध्यापर्यंत भरलेल्या चंचूपात्रात ठेवा. चंचूपात्राला उष्णता द्या. पानाचा रंग पूर्णपणे निघून जाईपर्यंत उष्णता देणे चालू ठेवा. त्यानंतर पान सावकाश बाहेर काढून घ्या आणि स्वच्छ पाण्याने धुवा, आता पान काचेच्या चकतीवर ठेवून त्यावर थोडे आयोडीनचे द्रावण ओता. त्या पानाचा रंग बदलून निळाकाळा झाल्यास पानामध्ये स्टार्च आहे असे आपल्याला समजते.
4. हिरव्या वनस्पती मध्ये होणाऱ्या आहाराच्या संश्लेषण क्रियेचे थोडक्यात वर्णन करा.
उत्तर – पानामध्ये असलेला हरितद्रव्य पानांना सूर्याची ऊर्जा शोषून घेण्यास मदत करतो ही ऊर्जा कार्बन-डाय ऑक्साईड आणि पाणी यापासून आहाराचे संसलेशन होण्यास वापरली जाते याला प्रकाश संश्लेषण क्रिया म्हणतात.
5. वनस्पती आहाराचे मूलभूत स्रोत आहे हे प्रवाही चित्राद्वारे स्पष्ट करा.
6. मोकळ्या जागा भरा.
a. हिरव्या वनस्पती आपला आहार स्वतः बनवितात म्हणून त्यांना स्वयंपोषी म्हणतात
b. वनस्पती द्वारे संश्लेषित आहाराचा संग्रह कार्बोहायड्रेट्स स्वरूपात केला जातो
c. प्रकाशसंश्लेषण क्रियेमध्ये ज्या रंगाद्वारे सौर ऊर्जा शोषली जाते त्याला हिरवा ( हरित) म्हणतात.
d. प्रकाशसंश्लेषण क्रियेमध्ये वनस्पती हवेतून कार्बन डाय-ऑक्साइड वायू घेतात आणि ऑक्सिजन वायू मुक्त करतात.
7. नाव सांगा.
1. पिवळ्या रंगाची तारेसारखी गोल नाजुक परपोशी वनस्पती.
उत्तर – कस्कुटा
2. स्वयंपोषी आणि परपोषी दोन्ही पद्धतीचा अवलंब करणारी वनस्पती.
उत्तर – घटपर्णी
3. जे रंध्र, ज्यातून पानांमध्ये वायूंची देवाण-घेवाण होते.
उत्तर – पर्णरंध्र
8. योग्य उत्तरासमोर ( ) खून करा
a. कस्कुटा याचे उदाहरण आहे.
1 स्वयंपोषी 2. परपोषी 3. शवोपजिवी 4. यजमान
उत्तर – परपोषी
b. किटकांना पकडून आपला आहार बनवणारी वनस्पती.
1. कस्कुटा 2. चिनी गुलाब 3.घटपर्णी 4. गुलाब
उत्तर – घटपर्णी
9. I व II मधील दिलेल्या घटकांच्या जोड्या जुळवा.
स्तंभ I स्तंभ 2
हरितद्रव्य सूक्ष्मजंतू
नायट्रोजन परपोषी
कस्कुटा घटपर्णी
प्राणी पान
किटक परोपजीवी
उत्तर –
हरितद्रव्य पान
नायट्रोजन सूक्ष्मजंतू
कस्कुटा परोपजीवी
प्राणी परपोषी
किटक घटपर्णी
10. खाली दिलेल्या विधानापैकी बरोबर किंवा चूक विधाने ओळखा
1. प्रकाश संश्लेषण क्रियेत कार्बन-डाय-ऑक्साईड मुक्त होतो – चूक
2. स्वतःचे अन्न स्वतः तयार करून घेणाऱ्या वनस्पतीला शवोपजीवी म्हणतात. – चूक
3. प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेद्वारे प्रोटीन हा घटक तयार होत नाही- बरोबर
4. प्रकाश संश्लेषण क्रियेत सौर ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर होते – बरोबर
11. योग्य पर्याय निवडा
प्रकाश संश्लेषण क्रियेत वनस्पतीचा कोणता भाग कार्बन-डाय-ऑक्साईड घेतो.
- तंतूमुळे b. स्टोमॅटो c. पानातील वाहिन्या d. फुलाच्या पाकळ्या
उत्तर – पाने
12. वनस्पती हवेतील कार्बन डाय-ऑक्साइड मुख्यता ज्या भागातून घेतात तो भाग
a. मूळ b. खोड c. फुले d. पाने
उत्तर – पाने
13. हरितगृहामध्ये शेतकरी अनेक फळांची व फुलांची पीक घेतात याचे शेतकऱ्यांना होणारे फायदे कोणते?
उत्तर – हरितगृहामध्ये वाढवलेल्या वनस्पतीनां वातावरणातील हानिकारक बदलापासून वाचविता येते. त्यांना अति पाऊस अति ऊन, धुके, यापासून संरक्षण मिळते.
वरील पाठावर आधारीत प्रश्नमंजुषा मिळविण्यासाठी येथे Click करा.
घटक 2 : प्राण्यांचे पोषण
Video आवडल्यास Fern Classes and Art या You tube channel ला नक्की subscribe करा.
रिकाम्या जागा भरा.
मानवातील पोषणाचे मुख्य टप्पे मुख विवर, अन्ननलिका, जठर, लहान आतडे आणि मोठे आतडे.
मानवाच्या शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी यकृत आहे
जठर हायड्रोक्लोरिक आम्ल आणि पाचकरस मुक्त करते जे अन्नावर क्रिया करतात
लहान आतड्यातील आतील भित्तीकेवर बोटाच्या आकाराच्या बाहेर आलेली विकरे असतात त्यांना शोषणेद्रीये म्हणतात.
अमिबा आपले अन्न अन्नविवरामध्ये पचवितो.
खाली दिलेली विधाने वाचून त्यातील बरोबर विधानासमोर( ) व चुकीच्या विधानासमोर ( X ) लिहा.
स्टार्सचे पचन जठरात होते. (चूक)
यांना मध्ये लाल मिसळण्यासाठी जीभ मदत करते. ( बरोबर)
पित्ताशय पित्तरसाचा तात्पुरता संग्रह करते. ( बरोबर)
रवंथ करणारे प्राणी गिळलेले गवत परत तोंडात आणून त्याचे चर्वण करतात. ( बरोबर)
खाली दिलेल्या विधानांना संबंधित योग्य पर्याय समोर खून करा
फटचे पचन यात होते.
उत्तर – जठर
- पचन न झालेल्या अन्नातील पाणी येथे शोषले जाते.
उत्तर – मोठे आतडे
- स्तंभ I मध्ये दिलेल्या घटकांचे स्तंभ II मधील घटकाशी जोड्या जुळवा
अन्नघटक पचनानंतर तयार झालेले उत्पादन
कार्बोहैड्रेटस फटी आम्ल आणि ग्लिसरोल
प्रोटीन्स साखर
फटस अमिनो आम्ल
उत्तर –
कार्बोहैड्रेटस साखर
प्रोटीन्स अमिनो आम्ल
फटस फटी आम्ल आणि ग्लिसरोल
- शोषणेद्रीय म्हणजे काय? ते कोठे असतात व त्यांचे कार्य काय?
उत्तर – लहान आतड्याच्या आतील भित्तीकेवर बोटाच्या आकाराची परंतू बाहेर आलेली हजारो विकारे असतात. त्यांना शोषणेद्रीये म्हणतात. शोषणेद्रीये पचन झालेल्या अन्नाचा रस शोषून घेतात.
- पित्तरस कोठे तयार होतो ? अन्नाचा कोणता घटक पचण्यासाठी तो मदत करतो?
उत्तर – पित्तरस यकृतामध्ये तयार होतो आणि पित्ताशयामध्ये संग्रहित होतो. तो स्निग्ध पदार्थांचे पचन करण्यासाठी मदत करतो.
- रवंथ करणाऱ्या प्राण्याकडून पचन होते परंतू मानवाकडून होत नाही अशा कार्बोहायड्रेट्सच्या प्रकाराचे नाव सांगा. याचे कारण देखील द्या.
उत्तर – गवतामधील कार्बोहायड्रेट्सचा एक प्रकार असलेल्या काष्ठतंतूचे पचन रवंथ करणाऱ्या प्राण्याकडून होते कारण त्यांच्या शरीरातील रुमेनमध्ये असलेले जीवाणू काष्ठतंतू पचन करण्यास मदत करतात.
- ग्लुकोजपासून आपल्याला तात्काळ उर्जा कशी मिळते?
- उत्तर – आपण थकून गेल्यानंतर उर्जा परत मिळविण्यासाठी ग्लुकोज द्रावण घेतो. ग्लुकोज थेट घेतल्यास पचन करणे आवश्यक नाही. म्हणूनच त्यापासून तात्काळ उर्जा मिळते.
- अन्नमार्गातील कोणता अवयव या क्रियेत सहभागी असतो?
- अन्नाचे अभिशोषण – लहान आतडे
- अन्नाचे चर्वण – मुखविवर
- सूक्ष्मजंतूंचा नाश करणे – जठर
- अन्नाचे पूर्ण पचन – लहान आतडे
- मलाची निर्मिती – मोठे आतडे
- स्तंभ I मध्ये दिलेल्या अवयवांचे स्तंभ II मध्ये दिलेल्या कार्याशी जोड्या जुळवा.
स्तंभ I स्तंभ II
- लाळा ग्रंथी 1. पित्तरस स्त्रवणे
- जठर 2. न पचलेले अन्न साठविणे
- यकृत 3. लाळेचे स्त्रवन
- मलाशय 4. आम्ल मुक्त करणे
- लहान आतडे 5. पचन पूर्ण होते.
- मोठे आतडे 6.पाण्याचे शोषण
7. मल मुक्त होते.
उत्तर –
लाळा ग्रंथी 1. लाळेचे स्त्रवन
जठर 2 आम्ल मुक्त करणे
यकृत 3. पित्तरस स्त्रवणे
मलाशय 4. मल मुक्त होते.
लहान आतडे 5. पचन पूर्ण होते.
मोठे आतडे 6. न पचलेले अन्न साठविणे
वरील पाठावर आधारीत प्रश्नमंजुषा मिळविण्यासाठी येथे Click करा.
chan