सुट्टीमध्ये मुलांचा अभ्यासाशी संपर्क राहावा यासाठी आम्ही सुरु करत आहोत रोजचा अभ्यास…
रोजचा अभ्यास दिवस 25
विषय – मराठी / विज्ञान
वर्ग | विषय | अभ्यास |
इयत्ता पहिली | मराठी | काना असलेल्या अक्षरांपासून सुरुवात झालेले कोणतेही 20 शब्द लिही. उदा. कागद तुला माहीत असलेल्या कोणत्याही 15 गावांची नावे लिही. पुस्तकातील 5 ओळी शुद्धलेखन लिही. |
इयत्ता दुसरी | मराठी | कोणतेही 20 जोडशब्द लिही. माझी शाळा या विषयावर 10 ओळी लिही. पुस्तकातील 10 ओळी शुद्धलेखन लिही. |
इयत्ता तिसरी | मराठी | मुंगी, कबुतर, शिकारी आणि झाडाचे पान हे शब्द वापरून गोष्ट तयार करा. कु, खु, गु,….असे प्रत्येक अक्षरांपासून तयार होणारे शब्द लिहा. |
इयत्ता चौथी | मराठी | यावर्षीची माझी सुट्टी या विषयावर 10 ओळी निबंध लिही. कोणतेही 20 समानार्थी शब्द लिही.कोणतेही 20 विरुद्धार्थी शब्द लिही. |
इयत्ता पाचवी | मराठी | कोणतेही 20 विरुद्धार्थी शब्द लिही. कोणत्याही 10 जंगली प्राण्यांची नावे लिहून त्यांचे लिंग बदल. 10 ओळी शुद्धलेखन लिही. |
इयत्ता सहावी | विज्ञान | फुलाची आकृती काढून भागांना नावे द्या. जलचक्र म्हणजे काय? जलचक्राची आकृती काढून माहिती लिही. घरातील काही घटक पाण्यात टाकून ते विद्राव्य किंवा अविद्राव्य आहेत का ते बघ. |
इयत्ता सातवी | विज्ञान | फुलाची आकृती काढून भागांना नावे द्या. जलचक्र म्हणजे काय? जलचक्राची आकृती काढून माहिती लिही. घरातील काही घटक पाण्यात टाकून ते विद्राव्य किंवा अविद्राव्य आहेत का ते बघ. |