MARATHI LIVE WORKSHEETS


⭐⭐⭐

Live worksheets च्या माध्यमातून मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त अशा निवडक Marathi Live Worksheets येथे उपलब्ध आहेत. मराठी भाषेपासून ते गणित व विज्ञान पर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या WORKSHEETS चा समावेश येथे आहे.

खालील शब्दांना क्लिक करा आणि मिळवा LIVE WORKSHEETS.

सोडवून झाल्यानंतर आपले गुण स्वतः तपासा.

⭐⭐⭐

1. आकार

अक्षर ओळख होण्याआधी विद्यार्थ्यांना विविध आकारांची ओळख होणे गरजेचे असते. आकार ओळख झाल्यास विद्यार्थी वेगवेगळी अक्षरे अगदी सहजपणे समजू व शिकू शकतो.

2. वाचन व लेखनपूर्व तयारी

जोड्या जुळवा या कृतीच्या माध्यमातून याठिकाणी प्राण्यांची चित्रे देण्यात आली आहेत. त्यामधील प्राण्याची वेगवेगळी मुद्रा ओळखून त्या जुळवायच्या आहेत. या माध्यमातून विद्यार्थ्यांची वाचन व लेखन पूर्व तयारी होईल.

3. शरीराचे अवयव

आपल्या स्वतःच्या शरीराचे अवयव ओळखता यावेत यासाठी ते ओळखून जुळविण्याची ही कृती आहे. शरीराच्या अवयवांची ओळख होणे आणि त्यांची माहिती मिळविणे हे या MARATHI LIVE WORKSHEET मधून अपेक्षित आहे.

4. जोड्या जुळवा

MARATHI SWAR LIVE WORKSHEETS मराठी स्वर या वर आधारित ही कृती आहे. दोन्ही बाजूला एकाच प्रकारचे स्वर दिलेले आहेत त्यांच्या जोड्या जुळवायच्या आहेत.

5. वाक्प्रचार

एका बाजूला मराठी वाक्यप्रचार दिलेले आहेत तर दुसऱ्या बाजूला त्यांचे अर्थ दिलेले आहेत.त्या वाक्प्रचारांच्या जोड्या त्यांच्या अर्थांशी जोड्या जुळवा.

6. संख्याज्ञान

संख्यांचे ज्ञानं व्हावे यासाठी ही कृती महत्वाची आहे. संख्या ओळखणे व त्यांच्या जुळविणे या माध्यमातून हे निश्चितच शक्य होईल.

7. मानवी पचनसंस्था

मानवी पचनसंस्थेमध्ये अनेक अवयव असतात. हे अवयव आपापल्या परीने कार्य करत असतात. त्यांचे स्थानही वेगवेगळे असते. या मराठी WORKSHEET मध्ये काही अवयव दिलेले आहेत. त्यांचे स्थान ओळखा.

8. संख्या वाचन

या WORKSHEET मध्ये काही संख्या दिलेल्या आहेत. त्यांना रेषा ओढून अक्षरांशी जोड्या लावायच्या आहेत. संख्या अक्षरात लिहिणे हि कृती यामधून सहजपणे साध्य होईल.

9. बेरीज

दोन अंकी हातच्याची बेरीज करण्याचा सराव व्हायला हवा. या WORKSHEET मध्ये काही उदाहरणे दिलेली आहेत. रिकाम्या जागी संख्या लिहून उत्तरे द्यावीत.

10. NUMBERS

ही थोडी वेगळ्या प्रकारची आणि आणि अत्यंत आनंददाई अशी WORKSHEET आहे. यामध्ये संख्यांचा आवाज दिलेला आहे. त्यावरून ती संख्या ओळखायची आहे.

11. बेरीज

एक व दोन अंकी हातच्याची बेरीज करण्याचा सराव व्हायला हवा. या WORKSHEET मध्ये काही उदाहरणे दिलेली आहेत. रिकाम्या जागी संख्या लिहून उत्तरे द्यावीत.

12. CLOTHES

या WORKSHEET मध्ये काही कपडे ( वस्त्र ) दिलेली आहेत. त्याचबरोबर त्यांची नावेही दिलेली आहेत. फक्त ती नावे त्या कपड्यांशी जुळवायची आहेत.

13. वनस्पतीचे भाग

वनस्पतीचे भाग | Vanaspatiche bhag यावर आधारित एक सोपी आणि सर्व मुलांना आवश्यक अशी ही एक Live worksheet आहे. यामध्ये वनस्पतीचे चित्र दिलेले असून वरील बाजूस वनस्पतीचे भाग दिलेले आहेत. भागांची नावे वनस्पती जवळ घेवून जावून योग्य त्या ठिकाणी चिकटवायची आहेत.

14. समानार्थी शब्द

समानार्थी शब्द या WORKSHEET मध्ये काही समानार्थी शब्द दिलेले आहेत. त्यांच्या जोड्या जुळवायच्या आहेत. तसेच दुसऱ्या प्रश्नामध्ये स्वतः समानार्थी शब्द शोधून लिहायचे आहेत.

15. One, Two, Three

इंग्रजी संख्या दिलेल्या आहेत. त्यासोबतच त्यांच्या स्पेलिंग विस्कटून दिलेल्या आहेत. त्या स्पेलिंग उचलून खालील अचूक चौकटीत ठेवायच्या आहेत.

16. परिसर अध्ययन 2 री ते 5 वी

या WORKSHEET मध्ये परिसर अध्ययन मधील काही प्रश्न दिलेले आहेत. चूक की बरोबर, जोड्या जुळवा, गटात न बसणारा शब्द या कृती अतिशय जिवंत पद्धतीने विद्यार्थ्यांना हाताळता येतील.

17. Time ( English)

वेळ समजण्यासाठी आणि ते ओळखण्यासाठी ही कृती दिलेली आहे. विद्यार्थ्यांना मराठीबरोबरच इंग्रजीमधूनही वेळ ओळखता यावी यासाठी ही WORKSHEET नक्की सोडवली पाहिजे.

18. Parts Of Our Body

Identify the parts of a body and drop it to the correct box. After completeing click on FINISH button and see the marks you scored.

19. विजयनगरचे साम्राज्य

विजयनगरचे साम्राज्य या घटकावर आधारीत 10 रिकाम्या जागा भरा ही कृती दिलेली आहे. यासाठी उत्तरेही दिलेली आहेत. ती शोधून योग्य रिकाम्या जागा भरायच्या आहेत.

20. विजयनगरचे साम्राज्य 2

वरील कृतीबरोबरच विजयनगरचे साम्राज्य या घटकावर आधारीत ही दुसरी WORKSHEET आहे. यामध्ये या साम्राज्याच्या वेळी बांधल्या गेलेल्या वास्तू दिलेल्या आहेत. त्यांच्या नावाशी जोड्या जुळवायच्या आहेत.

21. थोर व्यक्ती आणि त्यांचे टोपणनाव

महात्मा गांधी, पंडित नेहरू, टिळक, सुभाषचंद्र बोस यांची टोपणनावे माहिती होणे गरजेचे आहे. या WORKSHEET मध्ये या व्यक्तींची नावे आणि त्यांचे फोटो दिलेले आहेत. त्यांच्या जोड्या जुळवायच्या आहेत.

22. SIMPLE PRESENT TENSE PRACTICE

या WORKSHEET मध्ये 40 पेक्षा जास्त वाक्ये दिलेली आहेत. जेथे रिकाम्या जागी दिलेल्या पर्यायांपैकी योग्य उत्तर शोधायचे आहे. आणि बरोबर उत्तरावर CLICK करायचे आहे.

23. सर्वात्मका शिवसुंदरा

इयत्ता सातवीच्या पुस्तकातील लोकप्रिय अशी प्रार्थना “सर्वात्मका शिवसुंदरा” या वर आधारित काही प्रश्न खाली दिलेले आहेत. सातवीच्या सर्व मुलांना सोडविण्यास जरूर द्या.

ही पोस्ट शेअर करा...