3. भक्तिपंथ आणि सुफी परंपरा
या पाठाची प्रश्नोत्तरे खाली दिलेली आहेत. Iyatta Satavi Prashnottare. ते PDF मध्ये DOWNLOAD करण्यासाठी खाली लिंकही दिलेली आहे.
योग्य शब्दाने रिकाम्या जागा भरा.
1. अक्कमहादेवी यांचा वचनाचे धारण नाव चन्नमल्लिकार्जुन होय.
2. पुरंदर दास कृष्णदेवरायांच्या संस्थानामध्ये होते.
3. आदिकेशव हे कनकदास यांचे धारण नाव आहे.
4. कर्नाटकाचे कबीर असे शिशुनाळ शरीफ यांना म्हणतात.
5. चैतन्य यांचे पूर्वीचे नाव विश्वंबर होते.
6. सुपी संत ख्वाजा बंदेनवाज यांचे दुसरे नाव गेसुदराज होते
खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा
1. आंडाळ यांचे पूर्वीचे नाव काय?
उत्तर- आंडाळ यांचे पूर्वीचे नाव गोदादेवी होते.
2. अक्कमहादेवी यांचा जन्म कोठे झाला
उत्तर- अक्कमहादेवी यांचा जन्म शिवमोगा जिल्ह्याच्या उडूतडीमध्ये झाला.
3. कर्नाटक संगीताचे पितामह कोण ?
उत्तर- कर्नाटक संगीताचे पितामह
4. कनकदासांच्या आई वडीलांचे नाव काय?
उत्तर- कनकदासांच्या वडीलांचे नाव बिरप्पा आणि आईचे नाव बच्चम्मा होते.
5. प्रथम कन्नड मुस्लीम कवी कोण ?
उत्तर- प्रथम कन्नड मुस्लीम कवी कोण शिशुनाळ शरीफ होय.
6. शिखांचा पवित्र ग्रंथ कोणता?
उत्तर – ग्रंथ साहेब हा शिखांचा पवित्र ग्रंथ होय.
7. कलियुगातील राधा असे कोणाला संबोधले जाते?
उत्तर- कलियुगातील राधा असे मीराबाईला संबोधले जाते.
8. सुफी पदाचा अर्थ लिहा.
उत्तर- सुफी हा शब्द ‘साफ’ या शब्दापासून आला आहे. साफ म्हणजे शुद्ध अथवा स्वच्छ असा अर्थ होतो.
9. भारतातील सुफी संतांची नावे लिहा.
उत्तर- निजामुद्दीन औलिया आणि ख्वाजा बंदेनवाज हे प्रमुख सुफी संत होय.
10. चिस्ती पंथाची स्थापना कोणी केली?
उत्तर- चिस्ती पंथाची स्थापना मुइनिद्दीन चिस्ती यांनी केली.
III. दोन अथवा तीन वाक्यात उत्तरे लिहा.
1. कबीर दासानी केलेले उपदेश लिहा.
उत्तर- अल्ला आणि राम ही एकाच देवाची दोन नावे आहेत. मी राम आणि अल्लाचा मुलगा आहे. देहदंड, उपवास, तीर्थ यात्रा, पवित्र स्थानापासून आपण देवाला प्रसन्न करू शकत नाही. पण पवित्र भक्तीने मात्र आपण देवाला प्रसन्न करू शकतो असे कबीर दासानी उपदेश केले.
2. गुरुनानक यांची शिकवण लिहा.
उत्तर- विश्वामध्ये देव एकच आहे.फसवणूक, छळ, चोरी, हिंसा करू नये, गुरुकडून भक्ती व भक्तिमार्गाने मुक्ती मिळविता येते असे गुरुनानक यांनी सांगितले. मूर्तीपूजा, जातपद्धती, सतीपद्धती अशा सामाजिक अनिष्ठ प्रथांचा त्यांनी विरोध केला.
3. भक्ती पंथाचे परिणाम लिहा.
उत्तर- भक्ती पंथाचे परिणाम खालीलप्रमाणे आहेत-
भक्ती संत हे हिंदू- मुस्लीम यांच्यातील समानता राखण्यास कारणीभूत झाले. भक्ती संतानी लोकांच्या स्थानिक भाषेत साहित्यांची रचना केली त्यामुळे भारतीय भाषा समृद्ध झाल्या.
4. सुफी पंथाचे सार लिहा.
उत्तर- 1) देव एकच असून सर्व शक्तिमान आहे. आपण सर्व त्याची मुले आहोत.
2) चांगल्या कामाला महत्व दिले आहे.
3) सर्व मानव समान आहेत.
4) जाती पद्धतीचा विरोध केला आहे.
अ गटातील संबंधीत ब गटातील विषयांशी जोडी जूळवा
अ ब
गुरुनानक सुफिसंत
चैतन्य शिख धर्म
निजामुद्दीन औलिया कलियुगाची राधा
मीराबाई हरेकृष्ण पंथ
उत्तर- अ ब
गुरुनानक शिख धर्म
सुफिसंत निजामुद्दीन औलिया
चैतन्य हरेकृष्ण पंथ मीराबाई कलियुगाची राधा
वरील प्रश्नोत्तरे PDF मध्ये मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.
पाठ 4. नायक पाळेगार आणि नाडप्रभू प्रश्नोत्तरे येथे मिळवा.