सालाबादप्रमाणे यावर्षी देखील भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात देशात सर्वत्र साजरा केला जात आहे. सर्वत्र याबद्दलची तयारीही चालू आहे. हा कार्यक्रम सर्व सरकारी कार्यालात तसेच शाळांमध्येही साजरा केला जातो. यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्याचाच एक भाग म्हणजे स्वातंत्र्य दिन – मराठी भाषण स्पर्धा.
विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी स्वातंत्र्य दिन – मराठी भाषण नमुना भाषण खालीलप्रमाणे देत आहोत.
स्वातंत्र्य दिन – मराठी भाषण क्र.2
रंग बलिदानाचा त्याच रंगात पहावा
उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा
जय घोष भारताचा आसमंती गुंजावा
सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा…
अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन वर्ग, मंचावर उपस्थित मान्यवर, येथे जमलेले तमाम प्रतिष्ठित नागरिक आणि माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो आज मी आपल्याला भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांततेने ऐकून घ्यावे ही नम्र विनंती….
15 ऑगस्ट 1947 रोजी भारताचा इतिहास सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला. या दिवशी जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लाल किल्ल्यावर ध्वज फडकवला. तेव्हापासून प्रत्येकवर्षी देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर ध्वज फडकवतात. राष्ट्रगीत गायले जाते आणि 21 तोफांची सर्व शहीद झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांना श्रद्धांजली वाहिली जाते.
देशाचे पंतप्रधान आपल्या भाषणाद्वारे देशवासियांना संबोधित करतात आणि भारतीय लष्कर आपला पावर शो आणि परेड मार्च करते. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी सर्व भारतीयांच्या मनात देशभक्तीच्या भावनेसह खूप उत्साह असतो. स्वातंत्र्यानंतर आपल्या भारत देशाने आतापर्यंत बरीच प्रगती केली आहे. 15 ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी सर्व शाळा महाविद्यालय संस्था बाजार पेठ कार्यालये आणि कारखाने बंद असतात.
या दिवशी सरकारी सुट्टी असते. ठिकठिकाणी ध्वजारोहन केले जाते. शाळा-महाविद्यालये इत्यादीमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यात सर्व विद्यार्थी सहभागी होतात आणि देशभक्तीपर गाणी गातात. काही कवितांचे म्हणतात आणि काही देशभक्ती, सांस्कृतिक गीतांवर नृत्य करतात.
15 ऑगस्ट हा देशाचा अभिमान आणि सौभाग्याचा दिवस आहे. हा उत्सव म्हणजे आपल्या हृदयात नवीन ऊर्जा, नवीन आशा, उत्साह आणि देशभक्तीचा संवाद आहे. स्वातंत्र्यदिन आपल्याला आठवण करून देतो की हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी देशाने किती त्याग केले आहेत. ज्याचे संरक्षण आपल्याला कोणत्याही किमतीत करायचे आहे. आणि मला आशा आहे की एक सजग नागरिक बनून आपण सर्वजण या भारत मातेचे रक्षण करू.
अपनी आजादी को हम हरगिज मिटा सकते नही…
सर कटा सकते है लेकिन सर झुका सकते नही…
बोलो भारत माता की…. बोलो भारत माता की………
वंदे……… वंदे……….