स्वातंत्र्य दिन – मराठी भाषण क्र.3 Swatantrya Din Marathi Bhashan


सालाबादप्रमाणे यावर्षी देखील भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात देशात सर्वत्र साजरा केला जात आहे. सर्वत्र याबद्दलची तयारीही चालू आहे. हा कार्यक्रम सर्व सरकारी कार्यालात तसेच शाळांमध्येही साजरा केला जातो. यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्याचाच एक भाग म्हणजे स्वातंत्र्य दिन – मराठी भाषण स्पर्धा.

विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी स्वातंत्र्य दिन – मराठी भाषण नमुना भाषण खालीलप्रमाणे देत आहोत.

स्वातंत्र्य दिन – मराठी भाषण क्र.3

आदरणीय अध्यक्ष महोदय, प्रमुख पाहुणे, माननीय मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग आणि येथे उपस्थित माझे बाल मित्र-मैत्रिणी तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.

                        ना जियो धर्मं के नाम पर,

                        ना मरो धर्मं के नाम पर,

                        इंसानियत ही है धर्मं वतन का,

                        बस जियो वतन के नाम पर  

15 ऑगस्ट हा दिवस आपल्यासाठी नेहमीच खास राहिला आहे. कारण याच दिवशी आपला देश ब्रिटिश गुलामगिरीतून मुक्त झाला. पण हे स्वातंत्र्य आपल्याला इतक्या सहजासहजी मिळाले नाही. त्यासाठी अनेक जणांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली. काहीना तुरुंगवास भोगावा लागला. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, मंगल पांडे, भगतसिंग, सुखदेव, राजगुरु, लाला लाजपत राय अशा अनेक महान स्वातंत्र्य सैनिकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राण पणास लावले. त्या शूर वीर स्वातंत्र्यसैनिकांमुळेच आज आपण हा दिवस साजरा करत आहोत.   15 ऑगस्ट या दिवशी अनेक जाती धर्माचे लोक एकत्र येतात आणि तिरंगा ध्वज फडकवला जातो.

मोठ्या उत्साहाने व थाटामाटात हा दिवस साजरा केला जातो. सर्व सरकारी कामकाजास  सुट्टी असते. वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. 15 ऑगस्ट हा दिवस म्हणजे संपूर्ण देशासाठी एक पर्वणीच म्हणायला हरकत नाही. भारताचे स्वातंत्र्याचे स्वप्न साकार झाले ती फक्त  देशवासीयांच्या एक होऊन इंग्रजांविरुद्ध लढल्यामुळेच. ज्या वीर देश पुत्रांनी स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या विरपुत्रांना मी नमन करते आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन मी माझे भाषण संपवते. धन्यवाद… जय हिंद जय भारत!

ही पोस्ट शेअर करा...