महात्मा गांधी


महात्मा गांधी थोडक्यात माहिती

शांतीचा संत व अहिंसेचा दूत असणारे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील अग्रगण्य नेते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्म दि. 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरात मधील पोरबंदर येथे झाला. त्यांचे वडील करमचंद गांधी हे राजकोटचे दिवाण होते. त्यांच्या आईचे नाव पुतळाबाई होते. महात्मा गांधींचा विवाह वयाच्या 14 व्या वर्षी कस्तुरबा यांच्याशी झाला.

शिक्षण :

वयाच्या 12 व्या वर्षी महात्मा गांधीनी राजकोटच्या हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. ते मॅट्रिक झाल्यानंतर त्यांच्या वडीलबंधूनी त्यांना बॅरीस्टर होण्यासाठी इंग्लंडला पाठवले. 1891 मध्ये ते बॅरीस्टर होऊन मायदेशी परतले.

कार्य :

भारतात परतल्यानंतर काही दिवस ते दादा अब्दुल कंपनीच्या कामासाठी आफ्रिकेला गेले. तेथे त्यांना ब्रिटीश लोक हिंदी लोकांचा अपमान करतात हे लक्षात आले. हिंदी लोकांवर होणारा हा अन्याय दूर करण्यासाठी त्यांनी नाताळ हिंदी कॉंग्रेस स्थापन केले. त्यांच्यासाठी त्यांनी सत्याग्रह केला. त्यासाठी त्यांना तुरुंगातही जावे लागले. त्यांच्या उग्र लढ्याने शेवटी हिंदी लोकांवर होणारा अन्याय दूर झाला.

          त्यानंतर त्यांनी भारतातही अनेकदा सत्याग्रह केला. बिहारच्या चंपारण्यातील मजुरांवर होणारे अन्याय, अहमदाबादच्या गिरणी कामगारांवर होणारा अन्याय त्यांनी दूर केला. त्यांनी जातीनिर्मुलन, दारूबंदी, ग्रामसुधारणा, ग्रामोद्योग व साक्षरतेच्या प्रसारासाठी अविरत कार्य केले. ग्रामोद्योगासाठी गांधीजीनी चरख्याला प्राधान्य दिले.

          13 एप्रिल 1919 रोजी जालियनवाला बागेत सभेसाठी जमलेल्या जमावावर ब्रिटीश सरकारने गोळीबार केला. त्यामुळे गांधीजीनी 1920 साली असहकाराची चळवळ सुरु केली. ही चळवळ देशभर पसरली. मिठावर कर घेणे अन्यायाचे आहे म्हणून मिठाचा कायदा तोडण्याचे त्यांनी ठरविले. ते साबरमतीपासून दांडीला पायी निघाले. गांधीजींची ही यात्रा जगत प्रसिद्ध झाली. 8 ओगस्ट 1942 रोजी मुंबई येथे भरलेल्या कॉग्रेसच्या बैठकीत गांधीजींना चलेजावची घोषणा केली.

          पुढे 15 ओगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला. इंग्रजांनी देशाची फाळणी करून पाकिस्तानची निर्मिती केली. दंगली सुरु झाल्या. हिंदू-मुस्लीम ऐक्यासाठी गांधीजीनी पदयात्रा सुरु केली.

मृत्यू :

महात्मा गांधीजी सत्य  आणि अहिंसा या तत्वावर समाजकारण व अर्थकारण यांचे संघटन करता येते व ते अधिक न्यायकारक ठरते असे दाखवून देणाऱ्या महात्मा गांधीजींचा मृत्यू  30 जानेवारी 1948 रोजी झाला.

जागतिक अहिंसा दिन :

भारताला इंग्रजांपासून मुक्त करण्यासाठी महात्मा गांधींनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला. पण स्वातंत्र्यासाठी लढण्याची त्यांची पद्धत पूर्णपणे वेगळी होती. कोणालाही न दुखावता, हिंसा न करता इंग्रजांना देशातून हाकलून देण्यावर त्यांचा विश्वास होता. गांधीजी त्यांच्या अहिंसक चळवळीसाठी ओळखले जातात. गांधीजींना त्यांच्या अहिंसक वर्तनासाठी जागतिक स्तरावर आदर होता. हा आदर व्यक्त करण्यासाठी 2 ऑक्टोबर हा जागतिक अहिंसा दिन म्हणून साजरा करण्यात केला जातो.  

महात्मा गांधी Live Worksheet

महात्मा गांधी जयंती निमित्त त्यांच्या जीवनावर आधारीत महात्मा गांधी प्रश्नमंजुषा Mahatma Gandhi Quiz |Live Worksheet सोडविण्यासाठी येथे क्लिक करा.