वर्तमान पत्र हा बऱ्याच जणांचा जीव की प्राण असायचा. सकाळचा चहा आणि वर्तमानपत्र हे बरोबरीनेच व्हायचे. जगभरातील घडामोडी वर्तमान पत्रातूनच कळायच्या. पण जसजसा काळ बदलत गेला तसतशी मानवाची प्रगती होत गेली. नवनवीन शोध लागत गेले. वर्तमानपात्रांची जागा इलेक्ट्रोनिक माध्यमांनी घेतली. वर्तमान पत्रे घरापर्यंत येऊन पोहोचणेदेखील कठीण झाले.
पण आजही खूप लोक असे आहेत की ज्यांना कोणत्याही माध्यमातून वर्तमानपत्र वाचल्याशिवाय चैनच पडत नाही. कारण आपल्या परिसरातील स्थानिक बातम्या ह्या वर्तमानपत्रातूनच वाचायला मिळतात. आणि वाचण्याची ही मजा काही औरच असते. याच साठी आता वर्तमानपत्रेही डिजिटल रुपात मिळू लागली आहेत. जेणेकरून वाचकाला वर्तमानपात्रापर्यंत पोहोचणे शक्य नसले तरी वर्तमान पत्र वाचकांपर्यंत सहजरित्या पोहोचत आहेत.
आपली ही आवड लक्षात घेवून आम्ही काही निवडक जी मुफ्तपणे उपलब्ध आहेत अशी वर्तमानपत्रे येथे उपलब्ध करून देत आहोत.