LBA इयत्ता – 6 वी | विषय – मराठी | पाठ – देह मंदिर चित्त मंदिर


एकूण गुण – 20 | LBA इयत्ता – 6 वी

सन 2025-26 सालासाठी कर्नाटक सरकारच्या वतीने चालू असलेल्या LBA 2025-26 ( LESSON BASED ASSESSMENT) चा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांची प्रगती साधने आणि त्याचे विश्लेषण करणे हा आहे.

त्या अनुषंगाने आम्ही येथे देह मंदिर चित्त मंदिर या पाठाची MODEL प्रश्नपत्रिका देत आहोत.


प्र.1. योग्य पर्याय निवडा. (1 गुण × 4 = 4 गुण)

(सुलभ – 3, कठीण – 1)

  1. ‘दुर्बल’ या शब्दाचा अर्थ कोणता?
    अ) सशक्त  ब) अशक्त  क) सदृढ  ड) सबल
  2. पौरुषाची साधना कोणाच्या रक्षणाला हवी असे कवीला वाटते?
    अ) सबल  ब) सुखी  क) दुर्बल  ड) आनंदी
  3. कवीला कोणते दुःख दावो असे वाटते?
    अ) श्रीमंतांचे  ब) दुःखींचे  क) नास्तिकांचे  ड) आळशींचे
  4. या कवितेत ‘मंदिर’ असे कोणाला संबोधले आहे?
    अ) मन – प्रार्थना  ब) देह – चित्त  क) सत्य – सुंदरता  ड) आराधना – संवेदना

प्र.2. दिलेल्या शब्दांचा वाक्यात उपयोग करा. (2 गुण × 3 = 6 गुण)

(सामान्य)

  1. संशोधन
  2. प्रार्थना
  3. सुंदर

प्र.3. खालील प्रश्नांची दोन-तीन वाक्यांत उत्तरे द्या. (2 गुण × 3 = 6 गुण)

(सुलभ – 1, सामान्य – 2)

  1. एखाद्या गरीबाच्या मुलाला तुम्हाला कशी मदत करता येईल?
  2. सत्याच्या शोधासाठी काय आवश्यक आहे?
  3. कविंच्या मते बंधुत्वाची भावना कशी दृढ करता येईल?

प्र.4. खालील काव्यपंक्तींचा भावार्थ सांगा. (4 गुण × 1 = 4 गुण)

(कठीण)

“भेद सारे ………………….
…………………. आराधना”

ही पोस्ट शेअर करा...