
एकूण गुण – 20 | LBA इयत्ता – 6 वी
सन 2025-26 सालासाठी कर्नाटक सरकारच्या वतीने चालू असलेल्या LBA 2025-26 ( LESSON BASED ASSESSMENT) चा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांची प्रगती साधने आणि त्याचे विश्लेषण करणे हा आहे.
त्या अनुषंगाने आम्ही येथे रेषा आणि कोन पाठाची MODEL प्रश्नपत्रिका देत आहोत.
सोपे प्रश्न – 6 गुण
(Multiple Choice Questions, प्रत्येक 1 गुण)
- पूर्ण फेरीचे मापन किती अंश असते?
A) 90° B) 360° C) 180° D) 270° - दोन किरणे एकाच प्रारंभबिंदूपासून निघाल्यास तयार होणारा आकार कोणता?
A) बिंदू B) रेषा C) रेषाखंड D) कोन - आकृतीत किती रेषाखंड आहेत? (प्रश्न क्र. 4 मधील चित्र)
A) 1 B) 2 C) 3 D) 4 - कोन मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते?
A) कंपास B) प्रोट्रॅक्टर C) स्केल D) ट्रायएंगल
मध्यम प्रश्न – 10 गुण
(प्रत्येक प्रश्न 2 गुणाचे)
- कोन द्विभाजित करणारी रेषा म्हणजे काय? स्पष्टीकरण द्या.
- सरळ कोनात किती लहान कोन (acute angles) असू शकतात? उदाहरणासहित स्पष्ट करा.
- कोनाचे प्रकार लिहा आणि प्रत्येकी एक उदाहरण द्या. (काटकोन, लघुकोन, प्रविशाल कोन इ.)
- ∠BOC = 120° असेल तर ∠AOC आणि ∠COD शोधा.
- कोणत्या प्रकारच्या कोनांमध्ये मापन अनुक्रमे 0° ते 90°, 90° ते 180° आणि 180° पेक्षा जास्त असते? उदाहरणांसह लिहा.
कठीण प्रश्न – 4 गुण
(प्रत्येक प्रश्न 2 गुण)
- 80° चा कोन रेखाटण्यासाठी कोणते पायऱ्या वापराल? आकृतीसह स्पष्ट करा.
- AB आणि BC हे किरण एकाच बिंदूपासून (B) सुरू होतात. आकृती काढून वाक्य स्पष्ट करा.