LBA इयत्ता – 5वी | विषय – परिसर अध्ययन | पाठ – सजीव सृष्टी


खाली 10 गुणांची लेखी प्रश्नपत्रिका आणि 5 गुणांची तोंडी (Oral) चाचणी तयार केली आहे.

सन 2025-26 सालासाठी कर्नाटक सरकारच्या वतीने चालू असलेल्या LBA 2025-26 ( LESSON BASED ASSESSMENT) चा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांची प्रगती साधने आणि त्याचे विश्लेषण करणे हा आहे.

त्या अनुषंगाने आम्ही येथे 📝 इयत्ता – 5वी | विषय – परिसर अध्ययन | पाठ – सजीव सृष्टी पाठाची MODEL प्रश्नपत्रिका देत आहोत.

गुण वाटपानुसार:

  • सोपे (Easy) – 3 गुण
  • सामान्य (Average) – 4 गुण
  • कठीण (Difficult) – 3 गुण
  • किमान 3 Multiple Choice प्रश्न आहेत

लेखी प्रश्नपत्रिका – 10 गुण

(1) सोपे प्रश्न – 3 गुणे)

(1 गुणाचे ३ प्रश्न – त्यापैकी 3 बहुपर्यायी प्रश्न आहेत)

प्र.1. योग्य पर्याय निवडा: (1 गुण)
मानवी हालचाल कोणामुळे होते?
A. डोके  B. पाय  C. हात  D. पंख

प्र.2. योग्य पर्याय निवडा: (1 गुण)
वनस्पतींमध्ये अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात?
A. पचन  B. प्रकाशसंश्लेषण  C. उत्सर्जन  D. श्वसन

प्र.3. योग्य पर्याय निवडा: (1 गुण)
सर्व सजीवांचे मूलभूत एकक काय आहे?
A. ऊती  B. पेशी  C. अवयव  D. नसा


(2) सामान्य (मध्यम) प्रश्न – 4 गुण)

(२ गुणाचे २ प्रश्न)

प्र.4. सजीव आणि निर्जीव वस्तूंमधील दोन फरक लिहा. (2 गुण)

प्र.5. सजीव श्वास घेताना कोणता वायू आत घेतात आणि कोणता वायू बाहेर टाकतात? (2 गुण)


(3) कठीण प्रश्न – 3 गुण)

(एक 3 गुणांचा प्रश्न)

प्र.6. वार्षिक, द्विवार्षिक आणि बारमाही वनस्पतींची व्याख्या करा. प्रत्येकाचे एक उदाहरण द्या. (3 गुण)


मौखिक (Oral) चाचणी – 5 गुण

(प्रत्येकी ०.५ गुणाचे १० प्रश्न)

  1. सजीवांचे मूलभूत एकक कोणते आहे?
  2. एका मांसाहारी प्राण्याचे नाव सांगा.
  3. कीटकभक्षी वनस्पतीचे एक उदाहरण सांगा.
  4. पर्यावरण म्हणजे काय?
  5. पुनरुत्पादन म्हणजे काय?
  6. प्रकाशसंश्लेषणासाठी वनस्पती कोणता वायू वापरतात?
  7. सर्व सजीव उत्तेजनांना कसे प्रतिसाद देतात?
  8. बांदीपूर हे काय आहे?
  9. मिश्राहारी प्राण्यांचे एक उदाहरण द्या.
  10. टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याच्या क्रियेला काय म्हणतात?
ही पोस्ट शेअर करा...