इयत्ता पाचवी परिसर अध्ययन प्रश्नोत्तरे


सजीव सृष्टी

1.  सजीव कशापासून बनलेले असतात?

उत्तर – सजीव पेशीपासून बनलेले असतात.

2. सजीव श्वसनावाटे  कोणता वायू शिरीराबाहेर सोडतात?

उत्तर – सजीव श्वसनावाटे कार्बनडाय ऑक्साइड वायू शरीराबाहेर सोडतात.

3. हिरव्या वनस्पती आपला आहार कसा मिळवतात?

उत्तर – हिरव्या वनस्पती आपल्याला पाहिजे असलेला आहार आपणच तयार करतात.

4. प्रकाश संश्लेषण म्हणजे काय?

उत्तर – वनस्पती सूर्यप्रकाश, हवेतून कार्बन डाय ऑक्साईड, जमिनीतून पाणी , मातीतून खनिजे व क्षार  शोषून घेऊन पानातील हरितद्रव्याच्या सहाय्याने आहार तयार करतात यालाच प्रकाश संश्लेषण असे म्हणतात.

5. शाकाहारी म्हणजे काय?

उत्तर – जे प्राणी फक्त वनस्पती आणि वनस्पतीजन्य पदार्थ सेवन करतात त्यांना शाकाहारी  म्हणतात.

6. मांसाहारी म्हणजे काय?

उत्तर – जे प्राणी दुसऱ्या प्राण्यांना खातात त्यांना मांसाहारी असे म्हणतात.

7. पुनरुत्पादन म्हणजे काय?

उत्तर – सर्व सजीव आपल्यासारख्या पिल्लांना जन्म देतात या क्रियेला पुनरुत्पादन असे म्हणतात.

8. एक वर्षीय वनस्पती म्हणजे काय?

उत्तर – ज्या वनस्पती एक वर्ष अथवा हंगामापुरत्या कालावधीत फुलांची, फळांची, बियांची  निर्मिती करून नष्ट होतात त्यांना एक वर्षीय वनस्पती म्हणतात.

9. बहुवर्षीय वनस्पतींची दोन उदाहरणे लिहा.

उत्तर –  बहुवर्षीय वनस्पतींची दोन उदाहरणे आंबा आणि नारळ.

10. आम्ही वनस्पतींचे संरक्षण का केले पाहिजे?

उत्तर –  आम्ही वनस्पतींचे संरक्षण पावसासाठी, आहारासाठी, आणि भावी पिढीसाठी केले पाहिजे.

पाठ 2 – कुटुंब

1. कुटुंबाचे फायदे कोणते?

उत्तर –  मोठ्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी, आवश्यक गरजापुर्तीसाठी, नाते सुधारण्यासाठी, वात्सल्य निर्माण करण्यासाठी, प्रेम अनुभवण्यासाठी आणि सहकार्य मिळवण्यासाठी आपल्याला कुटुंबाची आवश्यकता आहे.

2. तुझ्या कुटुंबात किती सदस्य आहेत?

उत्तर –     माझ्या कुटुंबात ….. सदस्य आहेत. (हे उत्तर विद्यार्थ्याने स्वतः लिहावयाच आहे)

3. तुला बहिण आहे का?

उत्तर –  हो / नाही. मला बहिण आहे / नाही. ( हे उत्तर विद्यार्थ्याने स्वतः लिहावयाच आहे )

4. तुझ्या घरी आजी आजोबा आहेत का?

उत्तर – हो / नाही. माझ्या घरी आजोबा आहेत / नाहीत. (हे  उत्तर विद्यार्थ्याने स्वतः लिहावयाच आहे. )

5. तुझ्या आईचे नाव लिही.

उत्तर –  माझ्या आईचे नाव ……..आहे.

6. विभक्त कुटुंब म्हणजे काय?

उत्तर –  ज्या कुटुंबामध्ये फक्त दोन पिढ्यांचे सदस्य राहतात त्यांना विभक्त कुटुंब असे म्हणतात.

7. एकत्रित कुटुंब म्हणजे काय?

उत्तर –  ज्या कुटुंबामध्ये चार पिढ्या एकाच घरामध्ये राहतात त्या कुटुंबास एकत्रित कुटुंब असे म्हणतात.

8. तुझ्या कुटुंबाचा वंशवृक्ष तयार कर.

उत्तर –                                      

पाठ 3 – समाज

1. समाज म्हणजे काय?

उत्तर –  गावामध्ये अनेक कुटुंब राहतात. या सर्व कुटुंबांच्या समूहाला समाज असे म्हणतात.

2. भारतात शेकडा 72% लोक कोठे राहतात?

उत्तर –  भारतात शेकडा 72% लोक ग्रामीण भागात राहतात.

3. तू शहरात गेलास तर काय काय पाहशील?

उत्तर –  मी शहरात गेलो तर मोठमोठे बंगले, कॉलेज, गाड्या, दुकाने, लोकांची गर्दी, रेल्वे  पाहीन.

4. आदिवासी समाज कोणाला म्हणतात?

उत्तर –  दाट अरण्यामध्ये आणि डोंगराळ प्रदेशामध्ये राहणाऱ्या कुटुंबाच्या समूहाला आदिवासी समाज म्हणतात.

5. खेडेगावात दिसून येणारे विविध व्यवसाय कोणते?

उत्तर –  खेडेगावात शेती, सुतारकाम, कुंभारकाम, गवंडीकाम, गिरण, दुकान हे व्यवसाय असतात.

6. महानगरामध्ये लोक कशासाठी जातात?

उत्तर –  महानगरामध्ये लोक शिक्षण आणि उद्योगासाठी जातात.

7. शेती हा व्यवसाय कशावर अवलंबून असतो?

उत्तर –  शेती हा व्यवसाय पावसावर अवलंबून असतो.

8. समाजाचे विविध प्रकार कोणते?

उत्तर –  समाजाचे विविध प्रकार ग्रामीण समाज, शहरी समाज आणि आदिवासी समाज होय.

9. भारतामध्ये किती लहान व मोठी शहरे आहेत?

उत्तर –  भारतामध्ये सुमारे पाच हजार लहान आणि मोठी शहरे आहेत.

10. जल प्रदूषण म्हणजे काय?

उत्तर –  वेगवेगळ्या कारणामुळे पाणी दुषित होते त्यालाच जल प्रदूषण असे म्हणतात.

            पाठ 4 – समाजातील खेळ

1.खेळांचे फायदे कोणते?

उत्तर –  खेळांचे फायदे पुढीलप्रमाणे:

  1) खेळामुळे सहकार्य करण्याची वृती वाढते, आत्मविश्वास वाढतो,

  2) एकाग्रता, स्पर्धात्मक वृती वाढते.

  3) शरीर निरोगी राहते.

  4) मानसिक ताणतणाव कमी होतो.

2. साहसी खेळ म्हणजे काय?

उत्तर –  रोमांचक आणि विशेष अनुभव देणाऱ्या शारीरिक सामर्थ्यावर आधारीत खेळांना साहसी खेळ म्हणतात.

3. खेळामध्ये कधी सहभागी होऊ नये?

उत्तर –  योग्य प्रशिक्षण आणि मार्गदर्शन नसेल तर या खेळामध्ये सहभागी होऊ नये.

4. दोन आंतरराष्ट्रीय खेळांची नावे लिहा.

उत्तर –  क्रिकेट आणि हॉकी हे दोन आंतरराष्ट्रीय खेळ आहेत.

5. दोन साहसी खेळांची नावे लिहा.

उत्तर –  दही हंडी, स्कुबा डायविंग, पर्वत चढाई, कडे कोपऱ्यातून चढाई ही काही साहसी खेळांची नावे आहेत.

6. तुला आवडणाऱ्या चार खेळांची नावे लिही.

उत्तर – मला क्रिकेट, फुटबाल, खोखो, कॅरम, बुद्धीबळ हे खेळ आवडतात. (हे  उत्तर विद्यार्थ्याने स्वतः लिहावयाच आहे )

7. शरीर सुदृढ आणि निरोगी ठेवण्यास मदत करणाऱ्या दोन खेळांची नावे लिहा.

उत्तर –  फुटबाल, खोखो, हॉकी ,सायकलिंग, पोहणे हे शरीर सुदृढ व निरोगी ठेवण्यास मदत करतात.

8. माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली भारतीय महिला कोण?

उत्तर –  बचेंद्री पाल हि माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली भारतीय महिला होय.

9. स्थानिक खेळ कसे झाकोळले गेले आहेत?

उत्तर –  स्थानिक खेळ संगणक व इंटरनेट च्या आगमनाने झाकोळले गेले आहेत.

ही पोस्ट शेअर करा...