Computer Literacy Test ( CLT) for Govt. Employees


सर्व सरकारी नोकरदारांसाठी एक महत्वाची बातमी. CLT चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. अर्ज करणे सुरु असून आता आपल्या जिल्ह्यामध्येच टेस्ट देता येणार आहे. एक महिन्यापूर्वी घेतल्या गेलेल्या CLT परीक्षेचा निकालही लागलेला आहे.

CLT विषयी असलेल्या बऱ्याचशा शंका खालील प्रश्नोत्तरातून दूर होतील.

*Computer Literacy Test ( CLT)*

प्रश्न 1: CLT काय आहे आणि कोण देवू शकतं?
उत्तर : CLT म्हणजे COMPUTER LITERACY TEST ही सरकारी नोकरदारांसाठी  KEONICS कडून घेतली जाणारी  संगणक ज्ञान तपासून प्रमाणपत्र देणारी एक चाचणी (TEST) आहे.

*प्रश्न 2: ही टेस्ट सरकारी नोकर दारांसाठी अनिवार्य आहे काय?*
उत्तर : Government Order No: DPAR 104 E-Governance 2014, dated 2nd December 2014 नुसार ही टेस्ट भविष्यात सर्वांसाठी अनिवार्य होवू शकते.

*प्रश्न 3: या टेस्ट साठी आवेदन कसे करावे*?
उत्तर : https://clt.karnataka.gov.in/ ही त्यासाठी अधिकृत वेबसाईट आहे. त्यावर जावून आवेदन करावे लागते.

KITESTUDY CLT TEST

*प्रश्न 4: या टेस्ट साठी परीक्षा केंद्र कोणते असतात?*
उत्तर : वेगवेगळ्या नियोजनानुसार ही टेस्ट प्रत्येक जिल्ह्यात होत असते.

*प्रश्न 5: ही टेस्ट कोणत्या स्वरुपात घेतली जाते?*
उत्तर : ही टेस्ट ऑनलाईन स्वरुपात घेतली जाते. जिथे टेस्ट संपताच निकाल लगेच पहायला मिळतो.

*प्रश्न 6: ही टेस्ट  पुढील कोणत्या दिवशी नियोजित आहे?*
उत्तर : 07 नोव्हेंबर 2021 या दोन नजीकच्या दिवशी ही टेस्ट होणार आहे.

*प्रश्न 7: या टेस्ट साठी किती फी भरावी लागते?*
उत्तर : सरकारी नोकर दारांसाठी पहिला प्रयत्न पूर्णपणे मोफत असतो. यासाठी कोणतीही फी आकारली जात नाही.

*प्रश्न 8: पहिल्या प्रयत्नात नापास झाल्यास पुन्हा संधी मिळते का?*
उत्तर : हो. मात्र पुढील प्रत्येकवेळी आपल्याला परीक्षा फी भरावी लागेल.

*प्रश्न 9: फॉर्म भरण्यासाठी कोणते कागदपत्र आवश्यक आहेत?*
उत्तर : फॉर्म भरण्यासाठी खालील कागदपत्र/ गोष्टी आवश्यक आहेत.
1) आपला KGID नंबर
2) मोबाईल नंबर
3) ईमेल आयडी
4)स्कॅन केलेला पासपोर्ट साईझ फोटो (10kb to 50kb)
5) स्कॅन केलेली सही ( 10kb ते 20 kb)

*प्रश्न 10: या टेस्ट साठी Syllabus काय असतो?*
उत्तर : KEONICS कढून Syllabus निश्चित करण्यात आलेला आहे. तो तुम्ही येथे Download करू शकता.

प्र. 11 यासाठी सराव प्रश्नपत्रिका कशी मिळवावी?

उत्तर : खालील लिंकला क्लिक केल्यास सराव प्रश्नपत्रिका मिळेल.

*मागील परीक्षेचा नमुना:


*CLT EXAM Pattern*
NUDI FONTS – 05 MARKS
Word & Excel theory : 20 questions
Email : 5 to 7 questions
Printer, soft copy, hardcopy : 5 questions
Windows, System, Software : 5 questions
Internet explorer & browsers : 5-7 question’s
Other : 10
Word excel and email Practical : 20 questions

https://clt.karnataka.gov.in/ ही त्यासाठी अधिकृत वेबसाईट आहे. त्यावर जावून आवेदन करावे लागते.

दिनांक 3 ऑक्टोबर 2021 व 10 ऑक्टोबर 2021 रोजी घेण्यात आलेल्या CLT परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी खालील लिंकला क्लिक करून DOWNLOADS मध्ये SCORE कार्डला क्लिक करा.

ही पोस्ट शेअर करा...