5. मैसुरचे वडेयर | Iyatta Satavi Prashnottare


5. मैसुरचे वडेयर

या पाठाची प्रश्नोत्तरे खाली दिलेली आहेत. Iyatta Satavi Prashnottare. ते PDF मध्ये DOWNLOAD करण्यासाठी खाली लिंकही दिलेली आहे.

I)  रिकाम्या जागा योग्य शब्दाने भरा     

1.मैसुरू वडेयर यांची पहिली राजधानी श्रीरंगपट्टण होती.

2. दुसऱ्या अँग्लो मैसूर युद्धानंतर ब्रिटीशानी टिपू सुलतानबरोबर मंगळूर येथे तह केला.

3. मैसूरचा वाघ म्हणून टिपू सुलतान हे प्रसिद्ध आहेत

4. तिसरा कृष्णराज वडेयरचे दिवाण पुर्णय्याहोते .

5. मैसुरू संस्थानमध्ये न्यायविधायक सभा 1907 मध्ये सुरु झाली

6. . मैसुरू संस्थानचे गांधीजी म्हणून ………..यांना ओळखतात

7. भारतरत्न हि पदवी मिळालेला पहिला कर्नाटक वासी सर. एम. विश्वेश्वरय्या होय

8. इरविन कालव्याची निर्मिती सर मिर्जा इस्माईल या दिवानाने केली

II) खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा .

1. अठरा कचेरीची स्थापना कोणी केली ?

उत्तर- चिक्कदेवराय वडेयर यांनी अठरा कचेरीची स्थापना केली.

2. दरिया दौलत कोठे आहे ?

उत्तर- दरिया दौलत श्रीरंगपट्टण येथे आहे.

3. लालबाग उद्यान कोठे आहे ? त्याची सुरुवात कोणी केली ?

उत्तर- लालबाग उद्यान बेंगळूरू आहे. त्याची सुरुवात हैदरअलीने केली.

4. टिपू सुलतानच्या मृत्युनंतर मैसूरच्या सिंहासणावर कोण बसला?

उत्तर- टिपू सुलतानच्या मृत्युनंतर मैसूरच्या सिंहासनावर मुम्मड्डी कृष्णराज वडेयर बसला.

5. मैसुरू संस्थानमध्ये कमिशनर राज्यकारभार कशासाठी अंमलात आला ?

उत्तर- मुम्मड्डी कृष्णराज वडेयरने शिवमोग्गा जिल्ह्यातील नगर प्रदेशातील झालेला दंगा व्यवस्थित न हाताळल्यामुळे मैसुरू संस्थानमध्ये कमिशनर राज्यकारभार अंमलात आला.

6. मैसुरूच्या प्रमुख कामिशनरांची नावे लिहा ?

उत्तर- मार्क कब्बन आणि लुई बेथाम बौरिंग हे मैसुरुचे प्रमुख कमिशनर होते.

7. पुनर्दान म्हणजे काय ?

उत्तर- 1881 मध्ये ब्रीटीशानी दहाव्या चामराज वडेयरला पुन्हा राज्य सोपविले. यालाच पुनर्दान म्हणतात.

8. प्रजाप्रतीनिधी सभा केव्हा सुरु झाली ?

उत्तर- प्रजाप्रतीनिधी सभा केव्हा 1907 मध्ये सुरु झाली

9. कन्नड साहित्य परिषद कोठे आहे ? त्याची स्थापना केव्हा झाली ?

उत्तर- कन्नड साहित्य परिषद बेंगळूरूमध्ये आहे. त्याची स्थापना 1915 मध्ये झाली.

10. राजवाड्याचा सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले ?

उत्तर- राजवाड्याचा सत्याग्रहाचे नेतृत्व के. सी. रेड्डी यांनी केले.

III. )  गटात चर्चा करून उत्तरे लिहा .

1. हैदर अलीची कामगिरी कोणती ?

उत्तर- हैदर अलीला लिहिता वाचता येत नव्हते तरी त्याला कन्नड सहित काही भाषा अवगत होत्या. त्याने मैसुरू राज्याचा विस्तार केला. शूर योद्धा व दक्ष राजकारणी असलेल्या हैदर अलीला कर्नाटकच्या इतिहासात प्रमुख स्थान आहे.बेंगळूरू मधील लाल बागेची सुरुवात यानेच केली.

2. तिसऱ्या मैसुरू युद्धाचा परिणाम काय झाला ?

उत्तर- तिसऱ्या मैसुरू युद्धात ब्रिटिशानी टिपूवर आक्रमण केले. राजधानी श्रीरंगपट्टणला वेढा घातला. टिपूकडे दुसरा कोणताच मार्ग न उरल्यामुळे ब्रिटिशाबरोबर श्रीरंगपट्टण येथे शांती करार केला. या शांती करारानुसार त्याचे अर्धे राज्य ब्रिटिशाना दिले. युद्धाचे परिहार धन म्हणून 330 लक्ष रुपये दिले. तसेच आपल्या दोन्ही मुलांना त्यांच्याकडे ओलीस ठेवले.

3.टिपू सुलतानाच्या कार्याचे वर्णन करा.

उत्तर- टिपू सुलतानचे कार्य खालीलप्रमाणे –

  • टिपू सुलतानने बेंगळूरूचा राजवाडा, श्रीरंगपट्टणमधील उन्हाळी राजवाडा निर्माण केला.
  • त्याने रेशीम व्यवसाय व्यापक प्रमाणात लोकप्रिय केला.
  • कागद तयार करण्याचा कारखाना हरीहरमध्ये स्थापन केला.
  • आपले सैन्य अत्याधुनिक केले. बंदुकीचा कारखाना चालू केला.
  • रॉकेट वापराचे तंत्रज्ञान विकसित केले.
  • हिंदू देवालयांना व शेतकऱ्यांना मदत केली.

4. नाल्वडी कृष्णराज वडेयर यांच्या प्रमुख कार्याची यादी करा.

उत्तर- नाल्वडी कृष्णराज वडेयर यांचे प्रमुख कार्य खालीलप्रमाणे-

  • नाल्वडी कृष्णराज वडेयर यांनी विज्ञान संस्था स्थापण्यास 371 एकर जमीन आणि 5 लाखापेक्षा अधिक धन सहाय्य दिले.
  • न्याय विधायक सभा स्थापन करून जनतेच्या समस्यांवर उपाय शोधण्यास संधी दिली.
  • मैसुरूचा राजवाडा 1910 मध्ये बांधला.
  • कृष्णराजसागर धरण बांधले.
  • मागास वर्गांना सरकारी सेवेत विशेष प्रतिनिधित्व देण्याची घोषणा केली. 

5. सर एम.विश्वेश्वरय्या यांच्या कार्याचे वर्णन करा.

उत्तर- सर एम.विश्वेश्वरय्या यांचे प्रमुख कार्य खालीलप्रमाणे-

  • 1909 ते 1912 पर्यंत मैसुरू संस्थानचे मुख्य इंजिनियर म्हणून काम पाहिले.
  • मैसुरुचे दिवाण असताना वासाचे तेल, साबण, चामड्यापासून विविध वस्तू बनविणे इत्यादी कारखाने सुरु केले.
  • 1913 मध्ये मैसुरू बँकेची स्थापना केली.
  • प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले. कृषी शाळेची सुरुवात केली.
  • कन्नड साहित्य परिषदेची स्थापना केली.
  • कृष्णराजसागर धरणाचे कार्य त्यांच्या काळात पूर्ण झाले.

IV. जोड्या जुळवा.

अ                                                          ब

चिक्कदेवराय वडेयर                                                राजश्री

टिपू सुलतान                                                  भारतरत्न

         नाल्वडी कृष्णराज वडेयर                                          नवकोटी नारायण

         सर एम.विश्वेश्वरय्या                                  पहिले राज्यपाल

         जयचामराज वडेयर                                      मैसुरूचा वाघ

उत्तर- अ                                                         ब

चिक्कदेवराय वडेयर                             नवकोटी नारायण

टिपू सुलतान                                      मैसुरूचा वाघ

नाल्वडी कृष्णराज वडेयर                 राजश्री

 सर एम.विश्वेश्वरय्या                                 भारतरत्न

जयचामराज वडेयर                                पहिले राज्यपाल

वरील प्रश्नोत्तरे PDF मध्ये मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

पाठ 6. दिल्लीचे सुलतान प्रश्नोत्तरे येथे मिळवा.

ही पोस्ट शेअर करा...