6. दिल्लीचे सुलतान
या पाठाची प्रश्नोत्तरे खाली दिलेली आहेत. Iyatta Satavi Prashnottare. ते PDF मध्ये DOWNLOAD करण्यासाठी खाली लिंकही दिलेली आहे.
I. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून पूर्ण करा .
1.पृथ्वीराज चौहान याने तराईच्या युद्धात महमद घोरी चा पराभव केला .
2 .अल्लाउद्दीन खिलजीने दिल्लीत सिरी किल्ल्याची निर्मिती केली .
3 .इब्राहीम लोदीचा पराभव बाबर याने केला .
II. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा .
1. तराईच्या दुसऱ्या युद्धात महंमद घोरीने कोणाचा पराभव केला ?
उत्तर- तराईच्या दुसऱ्या युद्धात महंमद घोरीने पृथ्वीराज चौहान चा पराभव केला
2. कुतुबमिनार कोणी निर्माण केला ?
उत्तर- कुतुबमिनार कुतुबुद्दीन ऐबक याने निर्माण केला.
3. दिल्ली सुलतानांच्या काळातील कारभार केलेली महिला कोण ?
उत्तर- सुल्ताना ही दिल्ली सुलतानांच्या काळातील कारभार केलेली महिला होय.
4. दक्षिण भारतावर आक्रमण केलेल्या अल्लाउद्दिन खिलजीचा सेनापती कोण ?
उत्तर- दक्षिण भारतावर आक्रमण केलेल्या अल्लाउद्दिन खिलजीचा सेनापती गुलाम मलिक कपूर होय.
5. महंमद बिन तुघलखाने राजधानी कोठून कोठे स्थलांतरित केली ?
उत्तर- महंमद बिन तुघलखाने राजधानी दिल्ली येथून भारताच्या मध्यभागी असलेल्या देवगिरी येथे स्थलांतरित केली.
6. मी देवाचा प्रतिनिधी असे कोणत्या राजाने म्हटले ?
उत्तर- बल्बन या राजाने मी देवाचा प्रतिनिधी असे म्हटले.
II. गटात चर्चा करून उत्तरे लिहा .
1. महंमद गझनीच्या स्वाऱ्यांचे परिणाम लिहा .
उत्तर- महंमद गझनी हा अफगाणिस्ताणातील गझनी नावाच्या छोट्याश्या राज्याचा सुलतान होता. त्याने भारतावर 17 वेळा स्वाऱ्या केल्यामुळे भारतातील अनेक ऐश्वर्य-संपन्न शहरे उध्वस्त झाली. धार्मिक स्थळे नाश झाली.
2. दिल्लीवर कोणकोणत्या घराण्यानी राज्य केले ?
उत्तर- दिल्लीचा कारभार गुलाम, खिलजी, तुघलक, सय्यद आणि लोदी या 5 वंशांच्या राजांनी चालविला.
3. कुतुबुद्दीन ऐबकाची कामगिरी लिहा .
उत्तर- कुतुबुद्दीन ऐबकाने शत्रूला जिंकून तुर्कांचे राज्य बळकट केले. आपण मिळविलेल्या विजयाची आठवण म्हणून दिल्ली येथील मेहरौली येथे कुतुबमिनार बांधण्यास सुरुवात केले.
4. अल्लाउद्दिन खिलजीची महत्त्वाकांक्षा काय होती ?
उत्तर- संपूर्ण भारत जिंकून आपल्या अधिपत्याखाली आणावे अशी अल्लाउद्दिन खिलजीची महत्त्वाकांक्षा होती.
5. महंमद बिन तुघलकाने केलेले प्रयोग कोणते ?
उत्तर- महंमद बिन तुघलकाने राजधानी दिल्लीतून देवगिरीला स्थलांतरित केली. आणि नंतर निर्णय रद्द केला. तसेच चांदीच्या नान्याऐवजी तांब्याची नाणी चलनात आणली. पण तो हि निर्णय बदलला.
6. दिल्लीच्या सुलतानानी वास्तुशिल्पकला व साहित्याला दिलेले योगदान कोणते ?
उत्तर- दिल्लीच्या सुलतानाच्या काळातील प्रमुख वास्तुशिल्प कुतुबमिनार, अलाई दरवाजा, कव्वत-उल-इस्लाम मशीद आणि सिरी किल्ला ही होत.
या काळात उर्दू भाषा प्रचलित झाली. अमीर खुस्त्रो आणि अमीर हसन हे त्या काळातील प्रसिद्ध पर्शियन कवी व संगीतकार होत.जयशी या उर्दू कवीने “पद्मावत” हे सुफी काव्य लिहिले. रामानंद, कबीर, राईदास, मीरा हे सर्व या काळातील संत होत.
IV.अगटातील घटकांचा ब गटातील घटकाशी जोड्या जुळवा .
अ ब
जयशी अलाई दरवाजा
दौलताबाद सितार
अल्लाउद्दिन पदमावत
अमीर खुस्रो देवगिरी
उत्तर- अ ब
जयशी पदमावत
दौलताबाद देवगिरी
अल्लाउद्दिन अलाई दरवाजा अमीर खुस्रो सितार
वरील प्रश्नोत्तरे PDF मध्ये मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.
पाठ 7. मोगल प्रश्नोत्तरे येथे मिळवा.