
LBA प्रश्नपत्रिका :
सन 2025-26 सालासाठी कर्नाटक सरकारच्या वतीने चालू असलेल्या LBA 2025-26 ( LESSON BASED ASSESSMENT) चा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांची प्रगती साधने आणि त्याचे विश्लेषण करणे हा आहे.
त्या अनुषंगाने आम्ही येथे LBA इयत्ता 3 री गणित – पाठ 1 : आकार पाठाची MODEL प्रश्नपत्रिका देत आहोत.
एकूण गुण : 15
लेखी परीक्षा : 10 गुण (सोपे 3, मध्यम 4, कठीण 3)
मौखिक परीक्षा : 5 गुण
✏️ लेखी परीक्षा (10 गुण)
सोपे प्रश्न (3 गुण)
1. खालीलपैकी कोणता आकार ‘त्रिकोण’ आहे?
a) □ b) △ c) ○ d) ⬡
2. चौकोनाला किती बाजू असतात?
a) 2 b) 3 c) 4 d) 5
मध्यम प्रश्न (4 गुण)
3. दिलेल्या आकृतीत एकूण किती चौकोन दिसतात?

a) 1 b) 2 c) 3 d) 4
4. दोन त्रिकोण जोडल्यास कोणता आकार तयार होऊ शकतो? उदाहरणासह समजावून सांगा.
कठीण प्रश्न (3 गुण)
5. खाली दिलेल्या आकृतीमध्ये त्रिकोण, चौकोन व वर्तुळे दिली आहेत. त्यांची संख्या वेगवेगळी लिहा.

🎤 मौखिक परीक्षा (5 गुण)
1. वर्तुळाला किती बाजू असतात?
2. चौकोनाला किती कोन असतात?
3. आयताच्या विरुद्ध बाजू कशा असतात?
4. त्रिकोणाला किती बाजू असतात?
5. वर्तुळ काढण्यासाठी कोणते साधन वापरतात?
6. चौकोन व आयत यात मुख्य फरक काय?
7. गोलाकार वस्तूचे एक उदाहरण सांगा.
8. त्रिकोणी वस्तूचे एक उदाहरण सांगा.
9. आयताकार वस्तूचे एक उदाहरण सांगा.
10. पाचकोनी आकाराला काय म्हणतात?