LBA इयत्ता – 5वी | विषय – परिसर अध्ययन | पाठ – कुटुंब


खाली 10 गुणांची लेखी प्रश्नपत्रिका आणि 5 गुणांची तोंडी (Oral) चाचणी तयार केली आहे.

सन 2025-26 सालासाठी कर्नाटक सरकारच्या वतीने चालू असलेल्या LBA 2025-26 ( LESSON BASED ASSESSMENT) चा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांची प्रगती साधने आणि त्याचे विश्लेषण करणे हा आहे.

त्या अनुषंगाने आम्ही येथे 📝 इयत्ता – 5वी | विषय – परिसर अध्ययन | पाठ – सजीव सृष्टी पाठाची MODEL प्रश्नपत्रिका देत आहोत.

लेखी प्रश्नपत्रिका – 10 गुण

विभाग – I: सोपे प्रश्न (3 गुण – १ गुणाचे 3 प्रश्न, त्यात 3 बहुपर्यायी आहेत)

प्र.1. योग्य पर्याय निवडा: (1 गुण)

एकाच घरात दोन किंवा अधिक पिढ्यांच्या लोकांना एकत्र राहणे याला काय म्हणतात?
A. एकत्र कुटुंब  B. लहान कुटुंब  C. आधुनिक कुटुंब  D. संयुक्त कुटुंब

प्र.2. योग्य पर्याय निवडा: (1 गुण)

कौटुंबिक वृक्षात पुरुषांसाठी कोणते चिन्ह वापरले जाते?
A. वर्तुळ  B. त्रिकोण  C. चौरस  D. अंडाकृती

प्र.3. योग्य पर्याय निवडा: (1 गुण)

कुटुंबातील सदस्य एकमेकांशी ______ जोडलेले असतात.
A. साखळीने  B. आर्थिकदृष्ट्या  C. नात्याने  D. प्रेमाने

(उत्तर: नात्याने)


विभाग – II: सामान्य (मध्यम) प्रश्न (4 गुण – 2 गुणाचे 2 प्रश्न)

प्र.4. कौटुंबिक वृक्ष म्हणजे काय? दोन वाक्यांत समजावा. (2 गुण)

प्र.5. संयुक्त कुटुंब आणि विभक्त कुटुंब यामधील दोन फरक सांगा. (2 गुण)


विभाग – III: कठीण प्रश्न (३ गुण – एक प्रश्न)

प्र.6. कौटुंबिक वृक्षाद्वारे तुम्ही तुमच्या कुटुंबाची ओळख कशी करून देऊ शकता? (3 गुण)


मौखिक चाचणी – 5 गुण

  1. विभक्त कुटुंब म्हणजे काय?
  2. एकत्र कुटुंबाचे एक उदाहरण सांगा.
  3. कौटुंबिक वृक्षात स्त्रियांसाठी कोणते चिन्ह वापरतात?
  4. दोन पिढ्या एकत्र राहतात असे कोणते कुटुंब असते?
  5. कुटुंबातून आपण कोणते मूल्ये शिकतो? एक उदाहरण द्या.
  6. कुटुंबातील वडीलधारी मंडळींचा आदर का केला पाहिजे?
  7. कुटुंब म्हणजे काय?
  8. आजी कोणाची आई असते?
  9. कुटुंब सदस्यांचे संबंध काय दर्शवतात?
  10. कुटुंबामधील एक सण जे एकत्र साजरे करतात, त्याचे नाव सांगा.

ही पोस्ट शेअर करा...