सातवी समाज प्रश्नोत्तरे | SATAVI PRASHNOTTARE


पाठ 1 – विजयनगरचे साम्राज्य

1. रिकाम्या जागा भरा.

1. श्रीलंकेच्या राजांना हरवून खंडणी मिळविलेला दुसरा (प्रौढ) देवरायाचा सेनानी लक्कन्न दंडेश होय.

2. कृष्ण देवारायाने गजपती प्रतापरुद्री मुलगी जगन्मोहिनी हिच्याशी विवाह केला.

3. विजयनगर साम्राज्यात वरह सोन्याची नाणी होती.

4. विजयनगर साम्राज्यात सर्व धर्मातील लोक निश्चितपणे जीवन जगू शकतात असे सांगणारा विदेशी प्रवासी बार्बोस होय.

5. द्रविड शैली ही विजयनगर वास्तुशिल्पाचे श्रेष्ठ विकसित स्वरूप आहे.असे सांगितलेला कला इतिहासकार पर्सीब्रोन होय.

II खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

1. विजयनगर साम्राज्याचा संस्थापक कोण?

उत्तर – संगमचे पुत्र हरिहर, बुकराय, कंपन मारप्पा आणि मुद्दाप्पा यांनी विजयनगर साम्राज्याची स्थापना केली.

2. विजयनगर साम्राज्यात कोणकोणत्या वंशजानी राज्य केले?

उत्तर – विजयनगर साम्राज्यात संगम वंश, साळूव वंश, तुलुव वंश, कृष्ण देवराय यांनी राज्य केले.

3. संगम वंशातील प्रसिद्ध राजा कोण?

उत्तर – संगम वंशातील प्रसिद्ध राजा दुसरा प्रौढ देवराय होय.

4. विजयनगर साम्राज्यातील अत्यंत श्रेष्ठ राजा कोण?

उत्तर – विजयनगर साम्राज्यातील अत्यंत श्रेष्ठ राजा कृष्ण देवराय होय.

5. रक्कस तंगडीचे युद्ध केंव्हा झाले?

उत्तर – रक्कस तंगडीचे युद्ध 23 जानेवारी 1565 साली झाले.

6. विजयनगर साम्राज्याच्या उत्पन्नाची साधने कोणती?

उत्तर – वाणिज्य कर, व्यापारी कर, रस्ते कर, बाजार कर, निर्यात कार, बिदागी देणग्या इत्यादी विजयनगर साम्राज्याची उत्पन्नाची साधने होय.

7. विजयनगर साम्राज्यात कोणकोणते सण साजरे करत होते?

उत्तर – विजयनगर साम्राज्यात दिवाळी आणि दसरा हे सण साजरे करत होते.     

8. विजयनगर साम्राज्यातील प्रमुख पिके कोणती?

उत्तर – भात, जोंधळा , ऊस आणि कापूस ही प्रमुख पिके आहेत.

9. कृष्ण देवरायाच्या रचनांची (कृतीची) नावे लिहा.

उत्तर – तेलगु भाषेमध्ये त्यांनी आमुल माल्यद साहित्याची रचना केली. ‘जांबूवती कल्याण’, मदालसा चरित्रम’, ‘रसमंजरी’ इत्यादी कृष्ण देवरायांच्या रचनांची नावे आहेत.

10. विजयनगर ला भेट दिलेल्या विदेशी प्रवाशांची नावे लिहा.

उत्तर – बार्बोस, पार्सिब्रोन या विदेशी प्रवाशांनी विजयनगर ला भेट दिली.

11. विजयनगरच्या काळातील प्रमुख देवालये कोणती?

उत्तर – हजार राम स्वामी देवालय, विद्याशंकर देवालय, मोहरीचा गणेश आणि उग्रनरसिंह ही

         विजयनगरच्या काळातील प्रमुख देवालये होय.

III. खालील प्रश्नांना गटामध्ये चर्चा करून उत्तरे लिहा.

1) कृष्णदेवरायाच्या दिग्विजायाबद्दल माहिती लिहा.

उत्तर – कृष्णदेवराय एक शूर , पराक्रमी, चतुर सेनानी आणि उत्तम राज्यकर्ते होते. कृष्णदेवरायाने शत्रूंचा नाश करून दक्षिण भारतात विजयनगरच्या साम्राज्याचा विस्तार केला असे इतिहासकार सिवेल सांगतात. त्यांनी सा. शके 1510 मध्ये शिवनसमुद्र किल्ला ताब्यात घेतला. नंतर रायचूरचा किल्ला जिंकून घेतला.विजापूरच्या सुलतानाकडून गोवा जिंकून घेण्यासाठी पोर्तुगीजांना मदत केली. रायचूर ताब्यात घेतले. गुलबर्गा, बीदर किल्ले जिंकले.

2) विजयनगरच्या काळातील साहित्य कृतीची यादी करा.

उत्तर –  विजयनगर साम्राज्याच्या काळात विद्यारण्य यांनी ‘शंकर विजय’ आणि ‘सर्व दर्शन संग्रह’, सायनाचार्य यांनी ‘वेदार्थ प्रकाश’ आणि ‘आयुर्वेदिक सुधानिधी’ , गंगादेवी यांनी ‘मधुर विजयम’ प्रौढ देवरायनी ‘सुधानिधी’, कृष्णदेवरायनी ‘जांबूवती कल्याण’, ‘मदालसा चरित्रम’, ‘रसमंजरी’, भीम कवींचे ‘बसव पुराण’ इत्यादी साहित्य समृद्ध झाले.

खालील अ यादी संबंधीत ब यादीतील विषय ओळखून जोड्या जुळवा.

              अ                         ब

गंगादेवी                      आंध्रभोज

दुसरा देवराय               मधुर विजयम

कृष्णदेवराय                 विद्याशंकर देवालय

शृंगेरी                         गजधीपती

उत्तर – गंगादेवी            मधुर विजयम

दुसरा देवराय               गजधीपती

कृष्णदेवराय                 आंध्रभोज

शृंगेरी                         विद्याशंकर देवालय

ही पोस्ट शेअर करा...