Vidyapravesh | विद्याप्रवेश माझी प्रगती


विद्याप्रवेश हा कार्यक्रम NEP 2020 नुसार नव्याने शाळांमध्ये इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना लागू केला गेला जात आहे. त्यानुसार शैक्षणिक वर्षातील सुरुवातीच्या तीन महिन्यांमध्ये हा कार्यक्रम राबवायचा आहे.
हा कार्यक्रम राबवत असताना विद्यार्थ्यांपर्यंत प्रत्येक कृती कितपत पोहोचल्या किंवा विद्यार्थी कितपत या कृतींमध्ये सहभागी झालेत हे पाहणे आवश्यक असते. त्यानुसार प्रत्येक पंधरा दिवसातून एकदा “माझी प्रगती” ही मूल्यमापन पद्धत वापरलेली आहे. आणि त्याचा समावेश प्रत्येक विद्यार्थ्याच्या कृती पुस्तकात करण्यात आलेला आहे.
पंधरा दिवसाची “माझी प्रगती” ची नोंद ही फक्त विद्यार्थ्यांच्या पुस्तकात होत असल्याने शिक्षकांकडेही एकत्रितरीत्या विद्यार्थ्यांची प्रगतीची माहिती असणे गरजेचे आहे. त्यासाठी आम्ही हा खालील नमुना बनविला आहे. हा नमुना निश्चितच सर्व शिक्षकांना उपयुक्त ठरेल.

ही पोस्ट शेअर करा...