पाठ : 2 बहामनी आदिल शाही
या पाठाची प्रश्नोत्तरे खाली दिलेली आहेत. Iyatta Satavi Prashnottare. ते PDF मध्ये DOWNLOAD करण्यासाठी खाली लिंकही दिलेली आहे.
I. रिकाम्या जागा भरा.
1. बहामनी साम्राज्याची 1347 मध्ये स्थापना झाली.
2. कलबुर्गी बीदर सुलतानांची राजधानी होती.
3. फिरोज शहा सुलतानने भीमा नदीच्या काठावर फिरोजाबाद नगराची निर्मिती केली.
4. महमद गवानने बीदर येथे मदरसा बांधला.
5. बरीद शाही घराण्याचा संस्थापक खासिम बरीद होता.
6. गोवळकोंड्याचा संस्थापक खुलीकुतुब शहा होता.
7. इमादशाही घराण्याचा संस्थापक इब्राहीम होय.
II. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
1. बहामनी घराण्याचा संस्थापक कोण?
उत्तर – बहामनी घराण्याचा संस्थापक अल्लाउद्दीन हसन गंगु बहामनशहा होय.
2. महमद गवान कोण होता?
उत्तर – महमद गवान बहामनी राज्याचा मुख्यमंत्री होता.
3. सोळाखांब मशीद कोठे आहे?
उत्तर – सोळाखांब मशीद बिदर येथे आहे.
4. आदिलशाही सुलतानामध्ये सर्व श्रेष्ठ कोण?
उत्तर – आदिलशाही सुलतानामध्ये सर्व श्रेष्ठ युसुफ आदिल शहा.
5. दक्षिण भारतातील ताजमहाल म्हणून कोणत्या स्मारकाला म्हणतात?
उत्तर – दक्षिण भारतातील ताजमहाल म्हणून इब्राहीम रोजा स्मारकाला म्हणतात.
6. गोलघुमट कशासाठी प्रसिद्ध आहे?
उत्तर – गोलघुमट प्रतीध्वनीसाठी प्रसिद्ध आहे.
7. जगद्गुरू बादशहा ही पदवी कोणाला होती?
उत्तर – जगद्गुरू बादशहा ही पदवी दुसरा इब्राहीम आदिल शहाला होती.
III.
1.महमद गवानचे कार्य सांगा.
उत्तर – महमद गवानचे कार्य खालीलप्रमाणे-
- महमद गवानने विजयनगर साम्राज्याकडून हुबळी, बेळगावी आणि गोवा प्रदेश ताब्यात घेतले.
- राज्याचा कारभार इस्लाम नियमांना अनुसरून होता.
- त्याने लोकांना त्रासदायक असलेले कर रद्द केले.
2. पाच शाही घराण्यांची नावे लिहा.
उत्तर – 1. विजयनगरची आदिलशाही
2.बिदरची बरीद शाही
3. गोवळ कोंड्याची कुतुब शाही
4. अहमद नगरची निजाम शाही
5.विरारची इमाद शाही
3. दुसरा इब्राहीम आदिल शहा धर्म सहिष्णुतेचा पुरस्कर्ता होता याची चर्चा करा.
उत्तर – दुसरा इब्राहीम आदिल शहा धर्म सहिष्णुतेचा पुरस्कर्ता होता.अनेक हिंदू कवी तसेच संगीतकारांना त्याने आश्रय दिला होता. स्वतःच्या राजमहालातील दत्त मंदिराची दुरुस्ती करून पूजेची व्यवस्था केली. हिंदू संगीत मुसलमानामध्ये जनप्रिय करण्यासाठी प्रयत्न केले. तसेच हिंदू मुस्लीम सांस्कृतिक एकतेसाठी इब्राहिमने बरेच प्रयत्न केले.
IV. जोड्या जुळवा.
आदिल शाही अहमदनगर
कुतुब शाही बिरार
निजाम शाही विजयापूर
इमाद शाही बिदर
बरीद शाही गोवळकोंडा
उत्तर –
आदिल शाही विजयापूर
कुतुब शाही गोवळकोंडा
निजाम शाही अहमदनगर
इमाद शाही बिरार
बरीद शाही बीदर
वरील प्रश्नमंजुषा PDF मध्ये मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.
पाठ 3. भक्तिपंथ आणि सुफी परंपरा प्रश्नोत्तरे येथे मिळवा.